बेळगाव-उचगावच्या जवानास जम्मूमध्ये वीरमरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 14:54 IST2019-11-08T14:48:58+5:302019-11-08T14:54:17+5:30
जम्मू येथे दशहतवाद्यांशी लढताना बेळगाव तालुक्यातील उचगावच्या राहुल भैरू सुळगेकर (२२) या जवानास वीरमरण प्राप्त झाले. सुळगेकर हा जवान उचगाव मारुती गल्ली येथील रहिवाशी आहे.

बेळगाव-उचगावच्या जवानास जम्मूमध्ये वीरमरण
बेळगाव : जम्मू येथे दशहतवाद्यांशी लढताना बेळगाव तालुक्यातील उचगावच्या राहुल भैरू सुळगेकर (२२) या जवानास वीरमरण प्राप्त झाले. सुळगेकर हा जवान उचगाव मारुती गल्ली येथील रहिवाशी आहे.
चार वर्षापूर्वी राहुल मराठा रेजिमेंट येथून सैन्यदलात भरती झाला होता. सध्या तो चार मराठा युनिट मध्ये सेवा बजावत होता. जम्मू येथे दशहतवाद्यांशी मुकाबला करताना गुरुवारी त्याला वीरमरण प्राप्त झाले.
त्याच्या पश्चात्य आई, वडील, भाऊ असा परिवार असून तो अविवाहित होता. त्याचे वडील भैरू सुळगेकर हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत तर मोठा भाऊ मयूर सुळगेकर देखील सैन्य दलात सेवा बजावत आहे.
राहुलला वीरगती प्राप्त झाल्याची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक शोकाकुल झाले असून उचगाव गावावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी रात्री त्याचे पार्थिव बेळगावला आणण्याची शक्यता असून त्याच्या पार्थिवावर मूळ गावी अंतिम संस्कार होणार आहेत.