Valentine's Day Special: सह्याद्रीत बहरतेय वाघांची प्रेमकहाणी

By संदीप आडनाईक | Updated: February 14, 2026 16:39 IST2026-02-14T16:38:25+5:302026-02-14T16:39:01+5:30

‘सेनापती’जवळच मिळाले ‘चंदा’च्या पायांचे ठसे

Valentine's Day Special The love story of tigers blossoms in the Sahyadris | Valentine's Day Special: सह्याद्रीत बहरतेय वाघांची प्रेमकहाणी

Valentine's Day Special: सह्याद्रीत बहरतेय वाघांची प्रेमकहाणी

संदीप आडनाईक

कोल्हापूर : सह्याद्रीत वाघांसाठी यंदाचा व्हॅलेंटाइन डे खास ठरत आहे. एसटीआर-टी १ ‘सेनापती’ आणि एसटीआर-टी ४‘चंदा’ या नर-मादी वाघांची ही ‘जंगलातील प्रेमकहाणी’ केवळ बहरत नाही, तर जैवविविधतेच्या संवर्धनासाठीही मोलाची ठरत आहे. जंगलातील या ‘रॉयल कपल’कडून आता गोड बातमीची प्रतीक्षा आहे.

वाघ पुनर्स्थापना प्रकल्पांतर्गत सह्याद्रीत वाघांची संख्या पुन्हा वाढवण्याचे वनविभागाने उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यानुसार ऑपरेशन ताराअंतर्गत ‘चंदा’, ‘तारा’ आणि ‘हिरकणी’ या तीन वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल झालेल्या आहेत. ‘सेनापती’, ‘बाजी’ आणि ‘सुभेदार’ हे तीन वाघ आधीच या क्षेत्रात वास्तव्याला आहेत. गेल्या तीन वर्षांत ‘सेनापती’ने सह्याद्रीच्या जंगलक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. विशाल क्षेत्र व्यापत त्याने नैसर्गिक अधिवास तयार केला.

दुसरीकडे ताडोबातून स्थलांतरित झालेल्या ‘चंदा’नेही सुमारे ३५ चौरस किलोमीटर परिसरात आपले स्थानही भक्कम केलेले आहे. नुकतीच ‘सेनापती’ आणि ‘चंदा’ या या नर-मादी वाघांची भेट झाल्याचे पुरावा वनविभागाला मिळाले आहेत. वन्यजीव प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. 

कॅमेरा ट्रॅप आणि वनविभागाच्या निरीक्षणातून गेल्या आठवड्यापासून हे दोघे चांदोलीतील आंबा वनपरिक्षेत्रात एकत्र वावरताना दिसत आहेत. आता या ‘जंगलरांगांतील जोडी’चा एकत्र वावर प्रजननाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. वनविभागाच्या मते, ही केवळ रोमँटिक भेट नसून सह्याद्रीच्या पर्यावरणासाठी आशेचा किरण आहे. या दोघांच्या सहवासामुळे लवकरच सह्याद्रीत वाघांची नैसर्गिक संख्या वाढण्याची शक्यता बळावली आहे.

‘सेनापती’जवळच मिळाले ‘चंदा’च्या पायांचे ठसे

वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्याने टिपलेल्या फोटोमध्ये एसटीआर-टी १ ‘सेनापती’ याने मारलेल्या गवा टिपलेला आहे. उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस एसटीआर-टी ४ ‘चंदा’ वाघिणीचे डोळे चमकत असल्याचा फोटोही मिळालेला आहे. ‘सेनापती’चे छायाचित्र ज्या कॅमेरामध्ये आले आहे, त्या कॅमेऱ्याजवळच ‘चंदा’च्याही पायांचे ठसे मिळाले आहेत.

Web Title : सह्याद्री में वैलेंटाइन का तोहफा: बाघ जोड़े का रोमांस, उम्मीदें बढ़ीं

Web Summary : सह्याद्री में, बाघ सेनापति और चंदा का बढ़ता रोमांस बाघों की आबादी में वृद्धि की उम्मीद जगाता है। चंदोली जंगल में एक साथ देखे गए, उनका मिलन जैव विविधता और प्राकृतिक प्रजनन के लिए महत्वपूर्ण है। वन विभाग को सकारात्मक खबर की उम्मीद है, जिससे क्षेत्र में संरक्षण प्रयासों को बढ़ावा मिलेगा।

Web Title : Sahyadri's Valentine's Gift: Tiger couple's romance blooms, hope rises

Web Summary : In Sahyadri, tigers Senapati and Chanda's budding romance offers hope for increased tiger population. Spotted together in Chandoli forest, their union is vital for biodiversity and natural breeding. Forest department anticipates positive news, boosting conservation efforts in the region.