शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदी वैशाली डकरे

By admin | Updated: July 5, 2015 00:48 IST

निवड बिनविरोध : दोन महिन्यांसाठी संधी; हद्दवाढीसाठी प्रयत्नांची ग्वाही

कोल्हापूर : हलगीचा कडकडाट, रांगोळीचा सडा, फेटे परिधान केलेले नगरसेवक, कार्यकर्त्यांचा जल्लोष, आप्तस्वकियांची उपस्थिती अशा उत्साही वातावरणात कोल्हापूरच्या ४२व्या महापौरपदी कॉँग्रेसच्या वैशाली राजेंद्र डकरे यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली निवडीसाठी विशेष सभा झाली. महापौरपदासाठी उच्च न्यायालयातील याचिकेच्या निकालाच्या अधीन राहूनच महापौर निवड बिनविरोध झाल्याचे डॉ. सैनी यांनी घोषित केले. निवडीनंतर डकरे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. डकरे या माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या समर्थक आहेत. महापालिकेची निवडणूक आॅक्टोबरमध्ये होत आहे. त्याच्या अगोदर आचारसंहिता लागणार असल्याने डकरे यांना काम करण्यासाठी दोनच महिने मिळतील. कमी कालावधी त्यांना मिळत असूनही ते पद मिळावे यासाठी प्रचंड चुरस झाली. तृप्ती माळवी यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत उर्वरित कालावधीसाठी महापौरपदासाठी डकरे यांचा एकच अर्ज दाखल झाला. विशेष सभेत या निवडीची औपचारिकता पूर्ण झाली. सकाळी अकरा वाजता सभेत नियमाप्रमाणे डॉ. सैनी यांनी दिलेल्या माघारीचा कालावधी संपल्यानंतर महापौर निवडीची घोषणा केली. नगरसेवकांनी बाके वाजवून डकरे यांच्या निवडीचे जोरदार स्वागत केले. डकरे यांना काम करण्यास दोनच महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने लगेचच कार्यालय प्रवेश करून त्यांनी कामकाज सुरू केले. दरम्यान, सकाळी साडेदहाच्या सुमारास माजी मंत्री सतेज पाटील व कॉँग्रेस शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासमवेत ‘अजिंक्यतारा’ येथील कार्यालयातून दुचाकी रॅलीने केशरी रंगाचा फेटा घालून डकरे महापालिकेत आल्या. स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी विठ्ठल रामजी चौकापासून महापौर दालनापर्यंत रांगोळीचा सडा घातला होता. कार्यकर्त्यांनी कॉँग्रेसच्या विजयाच्या घोषणा दिल्या. निवडीनंतर डकरे समर्थकांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढली.