शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
2
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
3
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
4
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
5
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
6
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
7
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
8
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
9
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
10
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
11
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
12
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
13
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
14
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
15
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
16
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
17
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
18
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
19
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
20
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
Daily Top 2Weekly Top 5

शहरात २९५ सक्रिय कोरोना रुग्ण, ३३३५ व्यक्तींना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

कोल्हापूर : दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूने कोल्हापूरकरांच्या छातीत धडकी भरवली आहे. रोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कोल्हापूर शहर गेल्या काही ...

कोल्हापूर : दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणूने कोल्हापूरकरांच्या छातीत धडकी भरवली आहे. रोजच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कोल्हापूर शहर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आघाडीवर राहिले असून, सध्या २९५ सक्रिय कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठीही नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे. शनिवारी ३,३३५ व्यक्तींना लसीकरण करण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत जिल्ह्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या पहिल्यापासूनच मोठी आहे. आतापर्यंत १६ हजार ६१२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर मृतांची संख्या ३९६वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात ७७ नवीन रुग्णांची नोंद झाली तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. रविवार पेठेतील ७५ वर्षीय पुरुष, साळोखे नगरातील ४८ वर्षीय पुरुष तर मंगळवारपेठेतील ६१ वर्षीय पुरुषाचा त्यामध्ये समावेश आहे.

कोल्हापूर शहरातील सात ठिकाणे हॉटस्पॉट ठरु शकतात, त्यामुळे विशेष काळजी घ्यावी, अशी सूचना केंद्र सरकारकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर तसेच रात्री आठनंतर गर्दी करणाऱ्या हॉटेल, बार व परमिट रुम, व्यापारी आस्थापना यांच्यावर कारवाई केली जात आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच लसीकरणाची मोहीमही शहरात सुरु झाली असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी एका दिवसात ३,३३५ व्यक्तींनी केंद्रावर जाऊन लस घेतली. आतापर्यंत शहरात ६४ हजार १९९ व्यक्तींना पहिला डोस तर ७,६३९ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोलकुमार माने यांनी दिली.

लसीकरणाचे आकडे -

- हेल्थकेअर वर्कर - पहिला डोस - ११,८४६, दुसरा डोस - ५८९६

- फ्रंटलाईन वर्कर - पहिला डोस - ६७९२, दुसरा डोस - १५४२

- ४५ ते ५९ वयोगट - पहिला डोस - ३६३, दुसरा डोस - ६२

- ६० वर्षांवरील व्यक्ती - पहिला डोस - ३३,१९८, दुसरा डोस - १३९

- एकूण लसीकरण - ७१ हजार ८३८