शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ‘उत्तरेश्वर मशीद’

By admin | Updated: July 17, 2015 01:07 IST

सामाजिक बांधीलकी : मशिदीच्या विस्तारीकरणासाठी हिंदू बांधवाने दिली जागा

कोल्हापूर : ‘पुरोगामी शहर’ म्हणून कोल्हापूरचं अख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात नाव आहे. एकोपा आणि समाजाची बांधीलकी आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून आता उत्तरेश्वर मशिदीचाही समावेश करावा लागणार आहे. त्याच्या बांधकामासाठी हिंदू बांधवाने अल्प किमतीत जमीन देऊन सामाजिक बांधीलकी जपली आहे. उत्तरेश्वर मस्कुती तलावानजीक १९५४ मध्ये परिसरातील मुस्लिम नागरिकांनी एकत्रित येत १५ बाय १० ची छोटी प्रार्थना करण्यासाठी खोली बांधण्यात आली. कालांतराने प्रार्थना करणाऱ्यांची संख्याही वाढल्याने १९७४ मध्ये शेजारची जागा हिंदू बांधवाकडे मागण्यात आली. ही मागणी मान्य करत अल्प किमतीत त्यावेळी ही जागा हिंदू बांधवाने मशिदीसाठी दिली. पुन्हा कालांतराने मशिदीचा विस्तार करण्याचा मानस विश्वस्तांनी केला. त्यानुसार मागील वर्षी १६ जून २०१४ ला मशिदीचे बांधकामास सुरुवात केली. या काळातही मशीद उभारण्यासाठी उत्तरेश्वर, शुक्रवार पेठ आदी परिसरातील हिंदू बांधवांनी जमेल तशी मदत केली. पूर्वीपासून या परिसरात हिंदू-मुस्लिमांमध्ये एकोपा आहे. हा एकोपा आजच्या काळातही आजच्या पिढीतील लहान थोरांसह सर्वांनी जपला आहे. शुक्रवार पेठेतील धनवडे गल्ली येथे चार मजली मशीद बांधण्यात आली असून या मशिदीवर आकर्षक असा मिनारही बांधण्यात आला आहे. एकोपा आजही अबाधित पूर्वीपासून या परिसरात हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा असून दिवाळी, ईद हे सण एकमेकांमध्ये मिळून मिसळून साजरे केले जातात. पूर्वीच्या काळीही हीच परंपरा या परिसराने जपली होती तशाच पद्धतीने आजच्या पिढीनेही हीच परंपरा जपली आहे. हा एकोपा अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एकीचा संदेश देणारा आहे. - प्रा. अलाम नगारजी, विश्वस्त, उत्तरेश्वर मशीद