शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
4
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
5
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
6
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
7
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
8
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
9
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
10
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
11
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
12
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
14
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
15
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
16
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
17
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
18
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
19
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
20
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा ‘बिनधास्त’ वापर

By admin | Updated: January 13, 2015 00:14 IST

दप्तरात स्थान : शिक्षकांबरोबरच पालकांचीही वाढत आहे डोकेदुखी

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा -शालेय विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा बिनधास्त वापर सुरू असून, मोबाईलने विद्यार्थ्यांच्या दप्तरात स्थान मिळविले आहे. केवळ प्रौढांसाठी असणारे संदेश, क्लिप्स, आदी किशोरवयीन मुलेही एकमेकांसोबत शेअर करू लागल्याने हा प्रकार केवळ शिक्षकांचाच नाही, तर पालकांच्यादृष्टीने डोकेदुखी ठरू लागला आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून महाविद्यालयीन युवकांपर्यंत मोबाईल पोहोचला होता, पण गेल्या दोन वर्षांमध्ये हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांपर्यंत मोबाईल पोहोचला आहे. शहरी भागातील मुलांच्या दप्तरात सर्रास मोबाईल दिसू लागले आहेत. बऱ्याच शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय आवारात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे; परंतु शाळा सुरू असण्याच्या कालावधीत मोबाईल ‘सायलेंट’वर, तर इतरवेळी त्याचा खुला वापर, असा प्रकार आता रूढ होत चालला आहे.
सध्या मोबाईलपासून ते अँड्रॉईडपर्यंतचे सर्व प्रकार पालकांना हाताळता येत नाहीत; पण विद्यार्थी बिनधास्तपणे हाताळताना दिसतात. व्हॉटस्अ‍ॅप तसेच फेसबुकवर आता शालेय विद्यार्थ्यांचे फोटोही झळकू लागले आहेत. कॉल करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने ‘मेसेज’वर संवाद साधला जात आहे. या सर्व प्रकारांत अल्पवयीन मुलांकडून मोबाईलचा गैरवापर वाढत चालला आहे, अशा मुलांवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करताना शिक्षकांवर मर्यादा येत आहेत, तर पालकवर्गास मोबाईलचे पाल्यांचे हट्ट पुरविताना हाल होत आहेत.
मोबाईलवरील हिंसक, अश्लील क्लिप्स, गेम्स्, व्हॉटस्अ‍ॅप व संदेशाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये होणारी चर्चा, संदेशाची देवाणघेवाण हा सर्वच प्रकार विद्यार्थ्यांना गैरमार्गाकडे व अनैतिकतेकडे नेणारा ठरत आहे हे निश्चित.

फोटोसाठी वापर
शालेय विद्यार्थिनींचे फोटो काढण्यासाठीही विद्यार्थी मोबाईलचा वापर करताना दिसतात. आजरा बसस्थानकावर विद्यार्थिनींचे फोटो काढणे, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे, यावरून बऱ्याचवेळा वाद होताना दिसतात.


घराघरांत वाद
मोबाईलची विद्यार्थीवर्गांकडून होणारी मागणी व बऱ्याच पालकांकडून या मागणीला होणारा विरोध यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये घराघरांत वाद होताना दिसत आहेत.