शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जयसिंगपूरच्या कन्येचा अमेरिकेत डंका, उर्मिला अर्जुनवाडकर यांची उपमहापौरपदी फेरनिवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:07 IST

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर एका मराठी महिलेची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट

संदीप बावचे

जयसिंगपूर: शिक्षणाचे माहेरघर असलेल्या जयसिंगपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जयसिंगपूरच्या कन्या उर्मिला अशोक पुरंदरे - अर्जुनवाडकर यांची नुकतीच अमेरिकेतील न्यू जर्सी प्रांतातील ‘होपवेल’ टाउनशिपच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाली. या निवडीमुळे जागतिक स्तरावर जयसिंगपूरचे नाव उजळले आहे.उर्मिला अर्जुनवाडकर यांचे बालपण आणि शिक्षण जयसिंगपूरमध्ये झाले. शहरातील गल्ली नंबर चारमध्ये वास्तव्यास असलेल्या जनार्दन अर्जुनवाडकर यांच्या त्या कन्या आहेत. उर्मिला या गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ न्यू जर्सी येथील प्रतिष्ठित औषध कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती डॉ. अशोक विनायक पुरंदरे वैद्यकीय सेवेत आहेत. चार वर्षे नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले आहे. याआधी २०२४ मध्येही उपनगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. चार वर्षांच्या काळात त्यांनी आरोग्य, शाश्वत पर्यावरण विकास व संवर्धन, शहर संरचना या विभागाचे नेतृत्व केले. या कामगिरीमुळे त्यांच्याकडे पुन्हा उपनगराध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर एका मराठी महिलेची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे.होपवेल टाउनशिपच्या प्रशासनात आणि विकासकामांत आता जयसिंगपूरच्या कन्येचा शब्द प्रमाण मानला जाणार आहे. त्यांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने अमेरिकेच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. गेली चार वर्षे या प्रतिष्ठित नगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत.

उर्मिला यांचे योगदानकोविडनंतरच्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी उत्कृष्ट योजना व कार्यवाही केली. आरोग्यविषयक जागृतीसाठी देखील त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. औषध निर्मिती कंपनीत शास्त्रज्ञ असल्याचा फायदा त्यांना व तेथील नागरिकांना झाला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्या आग्रही असतात. होपवेल नगरपरिषदेला त्यांच्या धोरणामुळेच शाश्वत पर्यावरण विकास व संवर्धनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. शिवाय नगरसंरचनेमधील योगदानामुळे कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक नगरपरिषदेत आणण्यात त्यांचा विशेष सहभाग आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Daughter Urmila Arjunwadkar Re-elected as Deputy Mayor in America

Web Summary : Urmila Arjunwadkar from Jaysingpur, Kolhapur, has been re-elected as Deputy Mayor of Hopewell Township, New Jersey. Her contributions in health, environment, and urban development led to this honor, bringing pride to Jaysingpur.