‘गोकुळ’च्या सभेत अभूतपूर्व गोंधळ, मूठभर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न : अरुण नरके
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:20 IST2021-02-04T07:20:17+5:302021-02-04T07:20:42+5:30
Gokul News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसिडिंग वाचण्यावरून अभूतपूर्व गोंधळ उडाला.

‘गोकुळ’च्या सभेत अभूतपूर्व गोंधळ, मूठभर विरोधकांकडून सभा उधळण्याचा प्रयत्न : अरुण नरके
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसिडिंग वाचण्यावरून अभूतपूर्व गोंधळ उडाला. सभाच झाली नाही तर प्रोसिडिंग मंजूर कसे करता, असा सवाल करता विरोधकांनी शेवटपर्यंत हा मुद्दा लावून धरल्याने गोंधळात भर पडली. अखेर विषयपत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मताने मंजूर करण्यात आले.
‘गोकुळ’ची ५८वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अरुण नरके
होते. कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन करताना मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, या पहिल्या विषयावरच विरोधकांनी हरकत घेतली. गोंधळातच विषयपत्रिकेवरील विषय मंजूर करण्यात आले.
कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सेवानिवृत्त होऊनही त्यांना मुदतवाढ का, अशी विचारणाही करण्यात आली.