शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजच्या शेतकऱ्यांची कलामांना अनोखी श्रद्धांजली

By admin | Updated: July 30, 2015 00:00 IST

वाद्यांविना रंगली मिरवणूक : सुदृढ बैलजोडी स्पर्धेत २९ बैलजोड्यांचा सहभाग

गडहिंग्लज : ना पी डबाक ..ना ढोल ताशा..ना लेझीम..ना झांज..ना बँडबाजा या कोणत्याही वाद्यांशिवाय गडहिंग्लजच्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांची मिरवणूक काढली अन् माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.निमित्त होतं..महाराष्ट्रीयन बेंदूर सण व येथील शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे आयोजित सुदृढ बैलजोडी स्पर्धेचं. गेल्या सलग १५ वर्षांपासून ही स्पर्धा होत आहे. गडहिंग्लजसह सीमाभागातील हजारो शौकीन ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून येतात. मात्र, कलामजींच्या अचानक जाण्याने शेतकरी व कार्यकर्त्यांनी अत्यंत जड अंत:करणानेच ही स्पर्धा घेतली.दिवसभर वाजत-गाजत काढल्या जाणाऱ्या मिरवणुका आणि एकापेक्षा एक जातिवंत बैलजोड्यांचे प्रदर्शन असे वातावरण असते. मात्र, ‘मिसाईल मॅन’ कलामजींच्या जाण्याने शोकाकूल झालेल्या शेतकरी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आजची स्पर्धा वाजंत्रीविना घेण्याचे ठरवले, अन् पार पाडली.या स्पर्धेत एकूण २९ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. आदल्या दिवशीच स्पर्धेची तयारी पूर्ण झालेली होती. डॉ. कलाम यांच्या निधनामुळे स्पर्धा होणार की नाही याबाबत साशंकता होती. सकाळी काळभैरी मंदिरात आयोजित बैठकीत कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी पारंपरिक बेंदूर व स्पर्धा साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष राजेश बोरगावे, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष वसंत यमगेकर,‘भाजप’ तालुकाध्यक्ष मारुती राक्षे, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर, उपस्थित होते.स्पर्धेत बैलजोडी गटात गणपती डोमणे यांच्या बैलजोडीने, दाती गटात महाबळेश्वर कापसे यांच्या बैलजोडीने, तर बिनदाती गटात रावसाहेब मोकाशी यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. सायंकाळी बक्षीस वितरणही साधेपणानेच झाले. सविस्तर निकाल अनुक्रमे असा : बैलजोडी - गणपती गंगाराम डोमणे (गडहिंग्लज), रामगोंडा रायगोंडा पाटील (नूल), नारायण आत्माराम येरूडकर (बसर्गे), बाळासाहेब गोपाळ शिंदे (हेब्बाळ काा नूल), भीमराव लक्ष्मण बिरंजे (भडगाव) दाती गट - महाबळेश्वर निजाप्पा कापसे (नंदनवाड), राहुल भीमराव नेवडे (गडहिंग्लज), शिवाजी दत्तू मांडेकर (गडहिंग्लज), सुजित आप्पासाहेब यादव (नूल), बाबू भीमा खमलेहट्टी (गडहिंग्लज) बिनदाती गट - रावसाहेब तानाजी मोकाशी (खणदाळ), बाबूराव मल्लाप्पा मोर्डी (गडहिंग्लज), नारायण बाळाप्पा गवळी (बसर्गे), डॉ. सचिन शंकर कोडोली (भडगाव), राजू गौराप्पा लक्यान्नावर (खणदाळ). (प्रतिनिधी)