ज्योतिरादित्य सिंधिया उद्यापासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री संपर्क अभियानातील दुसरा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 15:45 IST2023-01-18T15:45:20+5:302023-01-18T15:45:53+5:30

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जास्त कार्यक्रम

Union Civil Aviation and Steel Minister Jyotiraditya Scindia will visit Kolhapur for two days from tomorrow | ज्योतिरादित्य सिंधिया उद्यापासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर, केंद्रीय मंत्री संपर्क अभियानातील दुसरा दौरा

संग्रहीत फोटो

कोल्हापूर : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलादमंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया उद्यापासून दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी या दौऱ्यात पक्षीय नऊ कार्यक्रम घेतले असून, त्यातील आठ कार्यक्रम हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री संपर्क अभियान राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातील सिंधिया यांचा हा दुसरा दौरा आहे.

उद्या गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ते कोल्हापूर विमानतळावर येतील. तेथून ते इचलकरंजीला रवाना होतील. तारदाळ येथील जलजीवन योजनेच्या प्रारंभासह इचलकरंजीत त्यांचे दिवसभरात सात कार्यक्रम होणार आहेत. त्यांचा कोल्हापूरमध्ये मुक्काम असून, शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर, संभाजीनगर आणि पुलाची शिरोली येथील कार्यक्रम आवरून ते पुण्याला रवाना होणार आहेत.

Web Title: Union Civil Aviation and Steel Minister Jyotiraditya Scindia will visit Kolhapur for two days from tomorrow