शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क न आकारणारे सर्वसामान्यांचे ग्रंथालय...

By admin | Updated: July 20, 2015 00:14 IST

जाहिरातबाजी करण्यापेक्षा दर्जेदार पुस्तकांसह कोणाचाही मुक्त संचार असलेले ग्रंथालय म्हणजे दौलतनगर येथील स्वातंत्र्यसैनिक प्रा. चंद्रकांत पाटगावकर (ग्रंथ) वाचक संघ होय.

आमच्या ग्रंथालयात इतकी पुस्तके आहेत, एवढ्या नवीन आवृत्त्या आमच्या ग्रंथालयात येणार आहेत, अशी जाहिरातबाजी करण्यापेक्षा दर्जेदार पुस्तकांसह कोणाचाही मुक्त संचार असलेले ग्रंथालय म्हणजे दौलतनगर येथील स्वातंत्र्यसैनिक प्रा. चंद्रकांत पाटगावकर (ग्रंथ) वाचक संघ होय. ग्रंथालयाचे सभासद होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारले जात नाही. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी येथील सुनील यळगूडकर यांनी आपल्या घरामध्ये वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोणताही समारंभ न करता २५० पुस्तकांसह ग्रंथालय सुरू केले. ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर, वसंत जोशी, चंद्रकुमार नलगे, प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. मंगेश कश्यप, डॉ. जे. के. पवार, दीपक भागवत (प्रवचनकार), रजनी हिरळीकर, श्याम कुरळे, सुरेश शिपुरकर, कै. अमरसिंह राणे यांनी भेट देऊन ग्रंथालयासाठी मोलाची मदत केली आहे. - प्रदीप शिंदे२५० पुस्तकांपासून सुरू केलेल्या ग्रंथालयात सध्या १२०० च्या आसपास दर्जेदार पुस्तके आहेत. सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत हे ग्रंथालय सर्वांसाठी खुले असते. या ग्रंथालयात सभासद होण्यासाठी वयाची अट नाही किंवा कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे हा ऐकमेव हेतू या ग्रंथालयांचा आहे. - सुनील यळगूडकर