शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींत बिनविरोधचा डंका

By admin | Updated: October 21, 2015 23:07 IST

ग्रामपंचायती निवडणुका : ५१७ जणांची तलवार म्यान; १0४ ग्रामपंचायतींसाठी १०३६ उमेदवार निवडणूक रिंगणात

सातारा : जिल्ह्यातील १७१ सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात बुधवारी ५१७ उमेदवारांनी तलवार म्यान केली असून, ६६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता १०४ ग्रामपंचायतींत जोरदार धूमशान पाहायला मिळणार आहे. १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये सातारा तालुक्यातील आंबळे, अंगापूर तर्फ तारगाव, बनघर, जोतिबाचीवाडी, खडगाव, कोंडवे, कुस बु., मापारवाडी, पाटेघर, वासोळे, अगुंडेवाडी, चाळकेवाडी, धनगरवाडी (निगडी), धनवडेवाडी, कूस खुर्द, निगुडमाळ, पिलाणीवाडी, राकुसलेवाडी, रामकृष्णनगर, भैरवगड. वाई तालुक्यातील गोळेगाव, सुलतानपूर. पाटण तालुक्यातील गुढे, अंबेघर तर्फ मरळी, डांगिष्टेवाडी, गहनबी, कारवट, पाचपुतेवाडी. महाबळेश्वरमधील कुंभरोशी, आमशी, पाली तर्फ आटेगाव, सोनाट, वानवली तर्फ सोळशी, वारसोळीदेव, वेळापूर, भीमनगर (पुनर्वसन), दाभदाभेकर, अकल्पे, बिरमणी, चिखली, घावरी, नाकिंदा, कोरेगावातील देऊर. कऱ्हाड तालुक्यातील जखीणवाडी. जावळीतील अपटी, दापवडी, धनकवडी, धोंडेवाडी, दिवदेव, जरेवाडी, केडांबे, केसकरवाडी, मोहाट, मोरावळे, शेंबडी, बाहुले या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.अतीत, किडगाव, कुमठे, भरतगाव, भाटमरळी, चिंचणेर वंदन, गोवे, निनाम, पाडळी, लावंघर, सारखळ, तासगाव, वर्णे, धनगरवाडी (कोडोली), कुमठे, शिवथर, सैदापूर, सोनवडी, वनगळ (ता. सातारा), पेठकिन्हई, वाठार किरोली, होलेवाडी, कठापूर (ता. कोरेगाव), अखेगणी, भालेघर, दुदुस्करवाडी, काटवली, महामुलकरवाडी, शेते, पवारवाडी, काळोशी (ता. जावळी), उंब्रज, कोपर्डे हवेली, शिरगाव, तांबवे (ता. कऱ्हाड), मेंढेघर, साखरी, नेचल, आंबळे, मोरेवाडी (ता. पाटण), केंजळ, जांभ, ओझर्डे, वाघजाईवाडी (वाई), कुमठे, उंबरी, चतूरबेट, दानवली, पारपार (महाबळेश्वर), वडगाव, धनगरवाडी, मोर्वे (ता. खंडाळा), वेटणे, पुनवडी (ता. खटाव), इंजबाब, रांजणी, देवापूर, वारुगड, शिंगणापूर (ता. माण), शेरेचीवाडी, पिराचीवाडी (ता. फलटण) या ग्रामपंचायतींत धूमशान होणार असून, काही ठिकाणी दुरंगी, तर बहुतांश ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढत होणार आहे. (प्रतिनिधी)नांदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला स्थगितीसातारा तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या मतदार यादीवर काही ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर या निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याने तालुक्यातील ९३ पैकी ९२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.खासदारांचे दत्तक कोंडवेही बिनविरोधसातारा तालुक्यातील कोंडवे हे गाव खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘सांसद ग्राम’ योजनेत दत्तक घेतले आहे. या गावची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन उदयनराजेंनी केल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेऊन खासदारांच्या विनंतीचा मान राखला आहे.बिनविरोध ग्रामपंचायतींची तालुकानिहाय आकडेवाडी अशी सातारा : २९ कोरेगाव : २ जावळी : १२ कऱ्हाड : १, पाटण : ६ वाई : २ महाबळेश्वर : १४