उद्धवसेना-शिंदेसेनेमध्ये कोल्हापूर महापालिकेत दालनावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:41 IST2026-03-25T11:40:28+5:302026-03-25T11:41:15+5:30

उद्धवसेनेच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तूरे यांनी कोणत्याही स्थितीत केबिन सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्याने हा वाद पेटला

Uddhav Sena-Shinde Sena dispute over hall in Kolhapur Municipal Corporation | उद्धवसेना-शिंदेसेनेमध्ये कोल्हापूर महापालिकेत दालनावरून वाद

उद्धवसेना-शिंदेसेनेमध्ये कोल्हापूर महापालिकेत दालनावरून वाद

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत सभागृह अस्तित्वात येऊन महिना झाला असताना दालनांवरून सुरू झालेले वादळ अद्यापही शांत होत नाही. आता उद्धवसेनेच्या गटनेत्या प्रतिज्ञा उत्तूरे व शिंदेसेनेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कौसर बागवान यांच्यात दालनावरून वॉर सुरू झाले आहे.

प्रतिज्ञा उत्तुरे यांना मिळालेल्या केबिनवर कौसर बागवान यांनी दावा केला. त्यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी महापौर रूपाराणी निकम, आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना साकडे घातले; परंतु उत्तुरे यांनी कोणत्याही स्थितीत केबिन सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्याने हा वाद पेटला आहे.

महापालिकेत गेल्या महिन्यात राजकीय पक्षांच्या गटनेत्यांच्या निवडी झाल्या. त्यानंतर प्रशासनाने गटनेत्यांना केबिन दिल्या. भाजपचे मुरलीधर जाधव यांनी यापूर्वीची राष्ट्रवादीची केबिन घेतल्याने राष्ट्रवादीचे आदिल फरास नाराज झाले होते. त्यामुळे फरास यांना दुसरी केबिन देण्यात आली. शिंदेसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी पूर्वीचीच केबिन घेतली. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे, उत्तुरे यांनाही केबिन देण्यात आल्या.

उत्तुरे यांनी केबिनची रंगरंगोटी इतर कामे करून नेत्यांचे फोटो लावले आहेत. मात्र, आता महिला व बालकल्याण समिती सभापती बागवान यांनी ही केबिन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने उद्धवसेना व शिंदेसेनेत जुंपली आहे. विशेष म्हणजे हा वाद सुरू झाल्याने उत्तुरे यांनी केबिनबाहेर स्वतःच्या नावाची पाटी लावून या केबिनचा दावा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title : कोल्हापुर निगम में केबिन को लेकर उद्धव सेना, शिंदे सेना में टकराव

Web Summary : कोल्हापुर नगर निगम में उद्धव सेना के समूह नेता और शिंदे सेना की समिति अध्यक्ष के बीच केबिन को लेकर विवाद हो गया। नेताओं को केबिन मिलने के बावजूद, संघर्ष जारी है, दोनों पक्ष अपने दावे जता रहे हैं।

Web Title : Uddhav Sena, Shinde Sena Clash Over Cabin in Kolhapur Corporation

Web Summary : A dispute erupted in Kolhapur Municipal Corporation as Uddhav Sena's group leader and Shinde Sena's committee chairperson fight over a cabin. Despite leaders receiving cabins, the conflict continues, with both sides asserting their claims.