शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

Kolhapur: उद्धवसेनेच्या गडहिंग्लज शहरप्रमुखाला ठार मारण्याची धमकी, मध्यस्थाला कार्यकर्त्यांचा चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 14:05 IST

खंडणीची तक्रार : ‘पोलिसाचा’ही सहभाग?

गडहिंग्लज : खंडणी उकळण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार उद्धवसेनेचे गडहिंग्लज शहरप्रमुख संतोष चिकोडे यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. या प्रकरणातील मध्यस्ताला संतप्त कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याही सहभाग असल्याची माहिती चिकोडे यांनी पत्रकारांना दिली. या प्रकारामुळे गडहिंग्लजसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.अधिक माहिती अशी, पंधरा दिवसांपूर्वी पुणे, आकुर्डी आणि पन्हाळा तालुक्यातील उंडरी येथील रहिवासी असलेल्या महिलेसह चौघांनी चार चाकी वाहनातून (एमएच १२ - व्हीव्ही ३८१६) सुमारे ५० लाख रुपये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी गडहिंग्लजला रोखीने आणले होते. रात्री गुंतवणूकदारांची वाट पाहत ते आजरा रोडवरील एका वसाहतीमध्ये थांबले होते.पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सापळा रचून संबंधित वाहनासह ही रोकड ताब्यात घेतली. तत्कालीन पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी यासंदर्भातील अहवाल आयकर विभागाला पाठविला आहे. रोकड जप्तीची कारवाई करताना साक्षीदार म्हणून शहरप्रमुख चिकोडे हे उपस्थित होते.घटनेच्या दुसऱ्या दिवशी ‘त्या’ स्थानिक मध्यस्थाने उद्धवसेनेचे उपशहरप्रमुख संदीप कुराडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. ‘५० लाखांच्या प्रकरणात चिकोडे यांच्या खुनाची सुपारी कर्नाटकातील गुंडांना देण्यात आली आहे. त्यांचे काय असेल ते पैसे देऊन मिटवा,’ असे त्याने कुराडेंना सांगितले. त्यानुसार चिकोडे यांनी प्रकाराची माहिती घेतली.सोमवारी (१४) ‘त्या’ मध्यस्ताला चिकोडे यांनी बोलावून घेतले होते. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. दरम्यान, त्याने एका पोलिसाच्या सांगण्यावरून आपण हे केल्याचे सांगितले. त्यानंतर ‘त्या’ मध्यस्थाला पोलिसांच्या हवाली करून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती.

जिल्हा पोलिस प्रमुखांकडे दाद जाणार‘त्या’ मध्यस्थाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्यासह दोघांविरुद्ध आपण गडहिंग्लज पोलिसांत तक्रार दिली आहे. दोन दिवसांत त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण जिल्हा पोलिसप्रमुखांकडे दाद मागणार आहोत, असेही चिकोडे यांनी यावेळी सांगितले.

५० लाखांचे प्रकरण साक्षीदाराच्या जिवावरपंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी ५० लाखांची रोकड जप्त केली. त्यावेळी चिकोडे हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. सरकारी कामात मदतीला गेल्यामुळेच त्यांच्या जिवावर हे प्रकरण बेतल्याची चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस