आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दोन तरूणावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:42 IST2020-04-15T12:29:05+5:302020-04-15T12:42:54+5:30

पुसेसावळी (सातारा):  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदी  कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल खटाव तालुक्यातील चोराडे  व राजाचे कुर्ले येथील  ...

Two youths are charged under Disaster Management Act | आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दोन तरूणावर गुन्हा दाखल

आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दोन तरूणावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देशासन आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचेवर पुसेसावळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुसेसावळी (सातारा):  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदी  कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल खटाव तालुक्यातील चोराडे  व राजाचे कुर्ले येथील  दोन युवकावर तोंडाला मास्क न लावलेबद्दल आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोरोना चा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. तरीदेखील सदर गावातील युवक हे कोरोना रोगाच्या संसर्गाची तमा न बाळगता स्वत:च्या आरोग्याची काळजी न घेता व समाजातील इतर लोकांना धोका निर्माण होईल असे आढळून आले. शासन आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचेवर पुसेसावळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two youths are charged under Disaster Management Act