कोल्हापूर : 'माझे प्रेम बघितलंस, आता वाईटपणही पहा' अशी धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येला प्रवृत्त करून कारणीभूत ठरल्याप्रकरणी ओंकार सुनील सावंत (वय २४, रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) याला करवीर पोलिसांनी अटक केली. त्याला आज, सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सहकारी मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आकाश शांताराम बोराडे (२३, रा. आर. के. नगर, कोल्हापूर, मूळ कातराबाद, ता. परांडा, जि. धाराशिव) याने १५ मे, २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी बोराडे याचा भाऊ विनायक याने रविवारी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार ओंकारसह अन्य तिघांना मित्रांकडे चौकशी सुरू केली आहे.
करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी आकाश याने स्वतः पाच पानी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात संशयित ओंकार सावंत यांच्याकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तसेच त्याने दिलेल्या धमकीला वैतागून जीवनाचा शेवट करून घेत असल्याचे म्हटले होते.
त्यानुसार तपास करून पोलिसांनी ओंकार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील वापरातील दोन मोबाइलही जप्त केले आहेत. पोलिसांनी त्याच्या खोलीतून पाचपानी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. त्या चिठ्ठीत लिहिलेल्या माहितीनुसार सावंत याच्याकडे चौकशी करून गुन्हा दाखल केला.
फिर्यादीत म्हटले आहे की, आकाश बोराडे व संशयित ओंकार सावंत दोघेही दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांत काही कारणांतून मतभेद निर्माण झाल्यानंतर संशयिताने ओंकारला शिवीगाळ, मारहाण करून माझे प्रेम बघितलंस, आता वाईटपणही पहा, अशी धमकी दिली. संशयितांकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली तसेच भाऊ आकाशच्या आत्महत्येला ओंकार हाच जबाबदार असून त्याच्यावर कारवाई करावी, असे त्यात म्हटले आहे.
दोन वर्षांपूर्वी ओळखबोराडे याची त्या मित्रासोबत सोशल मीडियावरून एका डेटिंग ॲप्सवरून ओळख झाली. त्यातून मैत्री झाली. या ओळखीच्या आधारे मित्राकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. ओंकार हा शहरातील एका कॅफेमध्ये कामाला आहे.
घरची परिस्थिती बेताचीओंकारची आई मोलमजुरी करते. वडीलही हाताला मिळेल ते काम करतात. एमबीएचे शिक्षण घेतलेल्या मुलाने आत्महत्या केल्याने या दोघांनाही धक्का बसला आहे.
मोबाइल जप्तपोलिसांनी दोघांचेही मोबाइल जप्त केले आहेत. त्यामध्ये ओंकार याने काही धमकीचे मेसेज, फोटो पाठविले आहेत का, याची तपास सुरु केला आहे. ओंकारच्या अन्य तीन मित्रांकडे चौकशी सुरू केली आहे.