दोघा सराईत दुचाकी चोरटयांना अटक, पंधरा चोरीच्या दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 01:55 PM2021-03-22T13:55:06+5:302021-03-22T14:05:52+5:30

Crimenews Bike Kolhapur-कोल्हापूर, सांगलीसह सीमावर्ती भागा दुचाकी चोरणाऱ्या दोघा सराईत चोरटयांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी जेरबंद केले, त्यांच्या कडून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीच्या पंधरा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

Two two-wheeler thieves arrested | दोघा सराईत दुचाकी चोरटयांना अटक, पंधरा चोरीच्या दुचाकी जप्त

दोघा सराईत दुचाकी चोरटयांना अटक, पंधरा चोरीच्या दुचाकी जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देदोघा सराईत दुचाकी चोरटयांना अटकसाडेचार लाख रुपये किमतीच्या पंधरा चोरीच्या दुचाकी जप्त

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसह सीमावर्ती भागा दुचाकी चोरणाऱ्या दोघा सराईत चोरटयांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी जेरबंद केले, त्यांच्या कडून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीच्या पंधरा चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुरेश कृष्णमूर्ती किती शेट्टी (वय 35, रा. वेंकटेश पार्क, मुडशिंगी ता. करवीर), मायाप्पा शिवाप्पा कोळी (वय 25, रा. पाटील करोली, तालुका मिरज) अशी संशयितांची नावे आहेत.

शेट्टी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, सांगलीसह निपाणी परिसरात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या कडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.

Web Title: Two two-wheeler thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.