शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आजरा तालुक्यातील जंगलात दोन पट्टेरी वाघ;  गवे, हत्तीपाठोपाठ आता वाघाची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 18:23 IST

आजरा : वेळवट्टी (ता. आजरा) येथील उंबराचे पाणी या नावाचे शेतामध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. धनाजी ...

आजरा : वेळवट्टी (ता. आजरा) येथील उंबराचे पाणी या नावाचे शेतामध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. धनाजी राणे यांच्या बंगल्याशेजारील काजूच्या बागेमध्ये झाडावरील फांदीवर हा वाघ पहुडला होता. ही घटना बुधवारी सायंकाळी ७:३० च्या दरम्यानची आहे. तालुक्यातील जंगलात असणाऱ्या दोन वाघांपैकी एक वाघ मानवी वस्तीजवळ येत असल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. गवे, हत्तीपाठोपाठ आता वाघाची दहशत तालुक्यात सुरू झाली आहे.डॉ. राणे हे आपल्या शेतातील बंगल्याशेजारील फूलझाडांना पाणी घालत होते. सोबत असणार कुत्रा जोरजोराने भुंकू लागला म्हणून त्यांनी बॅटरीचा झोत कुत्र्याच्या भुंकण्याच्या दिशेने टाकला असता काजूच्या मोठ्या झाडावर आडव्या फांदीवर हा पट्टेरी वाघ झोपल्याचे लक्षात आले. सुरुवातीला मोठ्या मांजरासारखा दिसणारा हा वाघ कुत्र्याच्या मोठ्याने भुंकण्याने व बॅटरीच्या झोतामुळे राणे यांच्या लक्षात आले. भुंकत पट्टेरी वाघाच्या दिशेने गेलेल्या कुत्र्याला त्यांनी बोलावून घेतले.या पट्टेरी वाघाने किटवडे, सुळेरान, गवसे येथील ५ पाळीव जनावरे मारली आहेत. तर या परिसरातील वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये दोन पट्टेरी वाघ स्थानबद्ध झाले आहेत. ३१ डिसेंबरला किटवडे येथील जंगलामध्ये गस्त घालण्यासाठी गेलेले पथक वाघाच्या डरकाळीने माघारी परत फिरले होते. सध्याही पट्टेरी वाघ दिवसा व रात्रीही मोठ्याने डरकाळी देत असल्याने त्यांचा आवाज पाच ते सहा कि. मी. अंतरापर्यंत जात आहे. त्यामुळे या परिसरात सर्वत्र भीतीयुक्त वातावरण आहे.सध्या जंगलात अन्न व पाणी मिळत नसल्याने ते नागरी वस्तीसह शेतातील वस्तीजवळ येत आहेत. तालुक्यातील जंगलात दोन पट्टेरी वाघ असल्याचे वनविभागाच्या कॅमेऱ्यातून लक्षात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगलाक्षेत्रामध्ये कोणत्याही कारणासाठी जाऊ नये, असे आवाहन वनक्षेत्रपाल मनोजकुमार कोळी यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTigerवाघforestजंगल