शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

By admin | Updated: September 23, 2014 23:53 IST

पूर्ववैमनस्यातून वाद : एक गंभीर, तलवार व दगडांचा वापर; परस्परविरोधी तक्रारी दाखल

इचलकरंजी : येथील कोल्हापूर नाका परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत इरफान दस्तगीर मुल्ला (वय २१, रा. विक्रमनगर) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. घटनेमुळे रात्री परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.काही दिवसांपूर्वी या दोन्ही तरुणांच्या गटात वाद झाला होता. त्यानंतर त्याचा राग मनात धरून काल, सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटांत पुन्हा वाद झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत तलवार, दगड यांचा सर्रास वापर करण्यात आला. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. याबाबत पोलिसांत विक्रम बाळासाहेब तोडकर (२२, रा. स्वामी मळा) याने दिलेल्या तक्रारीत, पिंटू ऊर्फ विकास अरविंद घाटुळे (२२, रा. जवाहरनगर), सनी ऊर्फ रणजित खंडेराव पाटील (२२, रा. हनुमाननगर), सुमित श्रीकांत महिंद (२२, रा. जवाहरनगर), दीपक महादेव कोळेकर (२२, रा. कोरोची), समीर सरदार नदाफ (२२, रा. जवाहरनगर), स्वप्निल सुरेश नंदे (१९, रा. लंगोटे मळा) व एकजण अल्पवयीन अशा सातजणांनी काल रात्री कोल्हापूर नाक्याजवळ तलवार व दगडांनी मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे. यामध्ये इरफान मुल्ला याच्या हातावर तलवारीने दोन वार झाल्याने तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)