शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग उद्योगासाठी दोन वेगवेगळे वीजदर

By admin | Updated: July 4, 2015 00:46 IST

प्रति युनिट ५० पैशांचा फरक : लहान यंत्रमागधारकांवर दरवाढीचा बोजा

इचलकरंजी : वीजदरासंदर्भात महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाने दिलेल्या आदेशामुळे यंत्रमाग उद्योगामध्ये वेगवेगळे वीजदर लागू होत आहेत. एकाच उद्योगात प्रति युनिट ५० पैशांची तफावत येत आहे. २७ अश्वशक्तीपर्यंत वीज वापर असणाऱ्या यंत्रमागांसाठी तीन रुपये ३१ पैसे व २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागांकरिता दोन रुपये ९६ पैसे वीजदराची आकारणी होत आहे.सध्या यंत्रमागासाठी वीज आकारणी करण्यात येत आहे. या निर्णयानुसार सर्व लघुदाब ग्राहकांचा सवलतीचा वीजदर प्रतियुनिट दोन रुपये ५७ पैसे आहे. सवलतीचा स्थिर आकार २७ अश्वशक्तीपर्यंत दरमहा ४० रुपये आणि २७ अश्वशक्तीवरील वीज ग्राहकांसाठी दरमहा ३० रुपये प्रति केव्हीए आहे. स्थिर आकार व वीज आकार यामध्ये आयोगाच्या आदेशानुसार होणारी वाढ सर्व यंत्रमागधारकांना भरावी लागणार आहे. २७ अश्वशक्तीच्या आतील ग्राहकांसाठी पाच रुपये सहा पैसेऐवजी पाच रुपये ४३ पैसे प्रति युनिट आकारणी केली आहे. तर २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांसाठी सात रुपये एक पैशाऐवजी सहा रुपये ८८ पैसे प्रतियुनिट केले आहे. याचा परिणाम म्हणून २७ अश्वशक्तीच्या आतील यंत्रमाग वीज ग्राहकांवर ५० पैसे प्रति युनिट असा दरवाढीचा बोजा पडणार आहे.वीजदराच्या तफावतीमुळे लहान यंत्रमागधारकांवर वीज दरवाढीचा बोजा पडणार आहे. परिणामी, कापड उत्पादन महाग होणार असल्याने त्यांचे नुकसान होणार असल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली. तसेच २७ अश्वशक्तीखालील बहुतांश यंत्रमागधारकांनी अद्याप टीओडी मीटर बसविले नसल्याने त्यांच्या वीज बिलामध्ये आणखीन २२ पैसे प्रति युनिट वाढ होईल. त्यांचे वीज बिल तीन रुपये ५३ पैसे इतके होणार असल्याने या यंत्रमागधारकांनी महावितरण कंपनीकडे ताबडतोब अर्ज देऊन टीओडी मीटर बसवून घ्यावेत, आणि तसे बिलिंग करून घ्यावे, असे आवाहन होगाडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)