शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-TET Paper leak case: दोघा म्होरक्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी, १६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:42 IST

‘मास्टरमाइंड’ गायब, या प्रकरणाचे बिहार-पाटणापर्यंत धागेदोरे गेले

मुरगूड : सोनगे येथील टीईटी पेपरफुटी प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपीकडून पोलीस तपासात या प्रकरणाचे बिहार-पाटणापर्यंत धागेदोरे गेले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील अटकेत असलेला मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याला २९ नोव्हेंबर तर राहुल पाटीलला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. तर अटकेत असणाऱ्या अन्य १६ जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली.याप्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपीकडून पोलिसांनी कसून तपास केला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. टीईटी आणि सेटच्या पेपर फोडण्याच्या या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेर पोहोचले असून, या प्रकरणाशी संबंधित आरोपी बिहार पाटण्याचे असल्याचे उघडकीस तपासात पुढे आले आहे.त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासयंत्रणा गतिमान केली आहे. या प्रकरणाची वाढती व्याप्ती पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अटकेत असणाऱ्या आरोपीकडून अधिक माहिती घेतली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांच्याकडे सोपविली आहे.महेश गायकवाड आणि राहुल पाटील या दोघांची ही अकॅडमी असून त्यांच्या माध्यमातून या अगोदर अशा घटना घडल्या असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोघांनाही पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांच्याकडील तपासातून अजून सविस्तर माहिती पुढे येणार आहे.या प्रकरणातील अमोल पांडुरंग जरग (वय ३८, रा. सरवडे, ता. राधानगरी, सध्या रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर कोल्हापूर), स्वप्निल शंकर पोवार,(वय ३५, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), संदीप भगवान गायकवाड (वय ४६, रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा), रणधीर तुकाराम शेवाळे (वय ४६, रा. सैदापूर, ता. कराड, जि. सातारा),तेजस दीपक मुळीक (वय २२, रा. निमसोड, ता. कडेगाव, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (वय ३२, रा. खोजेवाडी, जि. सातारा), संदीप शिवाजी चव्हाण (वय ४०, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड, जि. सातारा), श्रीकांत नथुराम चव्हाण (वय ४३, रा. विद्यानगर कराड, सध्या रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा), गुरुनाथ गणपती चव्हाण (वय ३८, रा. राधानगर), नागेश दिलीप शेंडगे (वय ३०, रा. सावर्डे पाटण, ता. राधानगर), रोहित पांडुरंग सांवत (वय ३५, रा. कासारपुतळे), अभिजित विष्णू पाटील (वय ४०, रा. बोरवडे, ता. कागल), अक्षय नामदेव कुंभार (वय २७, रा. सोनगे, ता. कागल) तर भावी शिक्षक दत्तात्रय आनंदा चव्हाण (वय ३२, रा. कासारपुतळे), किरण सातापा बरकाळे (वय ३०, रा. ढेंगेवाडी, सर्व ता. राधानगर), दयानंद भैरू साळवी (वय ४१, रा. तम नाकवाडा, ता. कागल) या १६ जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या सर्व सोळा जणांची कळंबा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

टीईटी पेपरफुटी प्रकरणात ‘मास्टरमाइंड’ गायबटीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार महेश गायकवाडला अटक करून कारवाईला सुरुवात केली असली तरी या प्रकरणाचा खरा ‘मास्टरमाइंड’ बेपत्ता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या व्यक्तीला जाणीवपूर्वक वाचवले जात आहे का? असा संशय अधिक गडद होत आहे. मुख्य मास्टरमाइंड कागल तालुक्यातील असल्याचीच चर्चा आहे.पेपर फोडण्यासाठी सोनगे हेच ठिकाण निवडण्यात आले, यामागे काही विशेष संबंध होते का? मास्टरमाइंडचा या गावाशी निकटचा संबंध असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे पेपरफोडीचा संपूर्ण कट सोनगेमध्ये बसवण्यात आला होता का, याच्या अगोदर या ठिकाणी किंवा दुसऱ्या जवळच्या ठिकाणी असा प्रकार या अगोदर झाला होता का, अशी शंका बळावली आहे.शैक्षणिक विभाग आणि सरकारी भरती प्रक्रियेत अनेकांना भूलथापा देत मोठी ‘माया’ कमावणारा हा मास्टरमाइंड पूर्वीपासूनच सराईत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्याला या प्रकरणातून काढून टाकण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सरळ प्रश्न उपस्थित केला जात आहे. अटक केलेल्या आरोपीच्या नातेवाइकांना ही पोलिस स्टेशनमध्ये सरळ सरळ भेटण्यासाठी सोडले जात होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur TET Paper Leak: Two key accused in police custody.

Web Summary : Kolhapur TET paper leak case reveals Bihar links. Two key accused get police custody; sixteen others remanded to judicial custody. Investigation ongoing.