शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

राजोपाध्येनगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी, एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:06 AM

हरिप्रिया कॉलनी, राजोपाध्येनगर येथील बंद असलेल्या दोन घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे शनिवारी (दि. २०) उघडकीस आले.

ठळक मुद्देराजोपाध्येनगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर : हरिप्रिया कॉलनी, राजोपाध्येनगर येथील बंद असलेल्या दोन घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे शनिवारी (दि. २०) उघडकीस आले.पोलिसांनी सांगितले, अमित बाळासाहेब चव्हाण (वय ३९) हे हरिप्रियानगर, राजोपाध्येनगरमध्ये औदुंबर गोरे यांच्या घरी भाड्याने राहतात. ते महापालिकेमध्ये लिपिक म्हणून नोकरी करतात. १९ एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास ते येळवण जुगाई (ता. शाहूवाडी) येथे कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते. २० एप्रिलला सकाळी घरी आले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

चव्हाण यांच्या घराशेजारीच दीपक दगडू कांबळे यांचे घर आहे. कांबळे हे वरच्या मजल्यावर झोपले होते. खाली दोन खोल्यांच्या दरवाजांना कुलूप लावले होते. चोरट्यांनी या घराचेही कुलूप तोडून ऐवज लंपास केला. दोन्ही घरांतून सोन्याची अंगठी, नाणे, टॉप्स, चांदीची भांडी, ताट, वाटी, करंडा, पंचापाळ, पणत्या असा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी चव्हाण यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर