राजोपाध्येनगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी, एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:07 IST2019-04-22T11:06:22+5:302019-04-22T11:07:09+5:30

हरिप्रिया कॉलनी, राजोपाध्येनगर येथील बंद असलेल्या दोन घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे शनिवारी (दि. २०) उघडकीस आले.

In two places in Rajopadalnagar, a house worth Rs | राजोपाध्येनगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी, एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

राजोपाध्येनगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी, एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

ठळक मुद्देराजोपाध्येनगरमध्ये दोन ठिकाणी घरफोडी एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर : हरिप्रिया कॉलनी, राजोपाध्येनगर येथील बंद असलेल्या दोन घरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे शनिवारी (दि. २०) उघडकीस आले.

पोलिसांनी सांगितले, अमित बाळासाहेब चव्हाण (वय ३९) हे हरिप्रियानगर, राजोपाध्येनगरमध्ये औदुंबर गोरे यांच्या घरी भाड्याने राहतात. ते महापालिकेमध्ये लिपिक म्हणून नोकरी करतात. १९ एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास ते येळवण जुगाई (ता. शाहूवाडी) येथे कुटुंबासह देवदर्शनासाठी गेले होते. २० एप्रिलला सकाळी घरी आले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

चव्हाण यांच्या घराशेजारीच दीपक दगडू कांबळे यांचे घर आहे. कांबळे हे वरच्या मजल्यावर झोपले होते. खाली दोन खोल्यांच्या दरवाजांना कुलूप लावले होते. चोरट्यांनी या घराचेही कुलूप तोडून ऐवज लंपास केला. दोन्ही घरांतून सोन्याची अंगठी, नाणे, टॉप्स, चांदीची भांडी, ताट, वाटी, करंडा, पंचापाळ, पणत्या असा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी चव्हाण यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
 

 

Web Title: In two places in Rajopadalnagar, a house worth Rs