कदमवाडीत चाकूहल्यात दोघे जखमी, दोघांना अटक : किरकोळ कारणांवरुन वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 14:39 IST2019-03-28T14:37:56+5:302019-03-28T14:39:14+5:30
किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादातून चाकू हल्यात दोघेजण जखमी झाले. जितेंद्र महादेव पोवार (वय ४२) व त्यांची श्रावणी पोवार (दोघेही रा. माळ गल्ली, कदमवाडी, सद्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलनजीक) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी कदमवाडीतील माळ गल्लीत घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद आबाजी आडुळकर (वय २१) सौरभ मारुती कागणीकर (२१ दोघे रा. माझी शाळा, कदमवाडी) यांना अटक केली.

कदमवाडीत चाकूहल्यात दोघे जखमी, दोघांना अटक : किरकोळ कारणांवरुन वादावादी
कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादातून चाकू हल्यात दोघेजण जखमी झाले. जितेंद्र महादेव पोवार (वय ४२) व त्यांची श्रावणी पोवार (दोघेही रा. माळ गल्ली, कदमवाडी, सद्या डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलनजीक) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी कदमवाडीतील माळ गल्लीत घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद आबाजी आडुळकर (वय २१) सौरभ मारुती कागणीकर (२१ दोघे रा. माझी शाळा, कदमवाडी) यांना अटक केली.
याबाबत माहिती अशी की, मंगळवारी रात्री माळगल्ली येथे प्रसाद आडुळकर आणि सौरभ कागणीकर हे दोघे येऊन त्यांनी जितेंद्र पोवार याचा पुतण्या ओंकार यास, तू व तुझे काका आमच्या भांडणामध्ये का पडला होता असा जाब विचारला.
यावरुन दोघांत शिवीगाळ होऊन वादावादी झालीू. त्यानंतर सौरभ कागणीकर याने जितेंद्र पोवार यांनाही शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर प्रसाद आडुळकर याने जितेंद्र यांच्या हातावर चाकूचा वार केला. त्यावेळी त्यांची मुलगी श्रावणी ही वाद सोडविण्यासाठी आली असता तिच्याही हातावर चाकूने जखम झाली.
त्यानंतर संशयीतांनी पुन्हा सोडणाार नसल्याची धमकी देऊन पळ काढला. त्यानंतर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी प्रसाद आडुळकर, सौरभ कागणीकर यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना बुधवारी रात्री अटक केली.