कागलजवळील अपघातात मुंबईचे दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST2020-12-15T04:41:32+5:302020-12-15T04:41:32+5:30
या अपघातात कारचा चक्काचूर झाला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावरील कागलनजीक पल्लवी ठिबक सिंचनसमोर हा अपघात घडला. कागल ...

कागलजवळील अपघातात मुंबईचे दोन ठार
या अपघातात कारचा चक्काचूर झाला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगलोर महामार्गावरील कागलनजीक पल्लवी ठिबक सिंचनसमोर हा अपघात घडला.
कागल पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ट्रक (एमएच ११- एएल-०३१३) कागल शहराच्या दिशेने तोंड करून रस्त्याकडेला उभा होता. कोल्हापूरहून निपाणीकडे जाणारी कार (एमएच -४६ -बीई ६७१५) भरधाव वेगाने जात होती. दरम्यान, रस्त्याकडेला उभारलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक देत कार ट्रकच्या मागील बाजूस घुसली. त्यामुळे कारच्या समोरच्या बाजूचा चक्काचूर झाला. हेडलाईट, आरसा इतरत्र पडलेले होते. आतील साहित्यही विस्कटलेले होते. कारचे कॅरिअर रस्त्याच्या कडेला काही अंतरावर पडले होते. ट्रकचा मागील गार्ड तुटून रस्त्याकडेला पडला होता. ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कागल पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फोटो कॅप्शन१४ कागल
: कागल येथे पल्लवी ठिबक एजन्सीसमोर ट्रक व कारच्या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.