शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Kolhapur: भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 15:41 IST

डंपरचालक पसार

देवाळे : चालकाचा भरधाव डंपरवरील ताबा सुटल्याने चौकात थांबलेल्या दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. मारूती रामचंद्र महाजन (वय ५७) व सुगंधा मारूती महाजन (५०) अशी मृतांची नावे आहेत. या भीषण अपघातात पती-पत्नी डंपरखाली चिरडले गेले. तर रस्त्याकडेला असणारा विद्युत खांब मोडला. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथे सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या डंपरने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गजबजलेल्या चौकात रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला उडवले. त्यानंतर वेगाने पुढे जात विद्युत खांबास धडक देऊन पुढे उभ्या असलेल्या कारला धडक दिली. कारमधील पाचजण एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी गेल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत डंपरच्या धडकेत विद्युत खांब मोडून अंगावर पडल्याने मृतदेह छिन्नविछिन्न झाले.डंपरचालक पसारअपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुख्य चौकात अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. या अपघातात मारूती महाजन व सुगंधा महाजन हे जागीच ठार झाले. तर चारचाकीमधील पाचजण रस्त्याकडेला गाडी लावून हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेल्याने पुढील अनर्थ टळला तर गाडीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत पुरवठा बंद करून विखुरलेल्या तारा दूर केल्या.शेतीकामासाठी आले होते गावी मृत दाम्पत्य मूळचे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर जाधववाडी येथील असून गेल्या अनेक वर्षापासून ते इचलकरंजी येथे कामानिमित्त येथे राहत होते. गेल्या आठवड्यात शेतीकामानिमित्त ते गावी आले होते. काम आटोपून आज सकाळी ते इचलकरंजीस जात असताना ही दुर्घटना घडली.मोठा अनर्थ टळलाअपघात झालेल्या ठिकणचा चौक नेहमी गजबजलेला असतो. वारणा कोडोलीकडे जाण्यासाठी सकाळी मोठी गर्दी असते. या ठिकाणी प्रवासी वाहतूक तसेच बस थांबा आहे. दररोजच्या तुलनेत आज कमी गर्दी कमी होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू