कोते येथे शॉर्टसर्किटने दोन घरांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 16:03 IST2020-12-30T15:51:44+5:302020-12-30T16:03:38+5:30

Fire Kolhapur-कोते (ता. राधानगरी) येथील शॉर्टसर्किटने ट्रॅक्टरला आग लागल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री दीड वाजता येथील आनंदी रघूनाथ चव्हाण व रेश्मा आकाश चव्हाण यांच्या रहात्या घराला आग लागून दोन्ही घरे खाक झाली आहेत . तर शेजाऱ्याचे किरकोळ नुकसान झाले आहे . या आगीमध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Two houses caught fire due to short circuit in Kote | कोते येथे शॉर्टसर्किटने दोन घरांना आग

कोते (ता. राधानगरी) येथील आगीत भस्मसात झालेले घर. (छाया- श्रीकांत ऱ्हायकर)

ठळक मुद्देकोते येथे शॉर्टसर्किटने दोन घरांना आग दोन्ही घरातील प्रापंचिक साहित्य खाक

धामोड-कोते (ता. राधानगरी) येथील शॉर्टसर्किटने ट्रॅक्टरला आग लागल्याची घटना ताजी असतानाच काल मध्यरात्री दीड वाजता येथील आनंदी रघूनाथ चव्हाण व रेश्मा आकाश चव्हाण यांच्या रहात्या घराला आग लागून दोन्ही घरे खाक झाली आहेत . तर शेजाऱ्याचे किरकोळ नुकसान झाले आहे . या आगीमध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कोते गावानजीक असणाऱ्या चव्हाणवाडी वसाहतीतील श्रीमती आनंदी रघुनाथ चव्हाण व रेश्मा आकाश चव्हाण यांच्या राहत्या घराला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या दोन महिलांनी आरडावोरड करताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु आगीने रुद्र रूप धारण केल्याने आग विझवता आली नाही.

या आगीत धान्य, कपडे, भांडी, लाकडी साहीत्य व घर असे जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेचा पंचनामा पोलिस पाटील श्रीकांत कांबळे , तलाठी संदिप हजारे यांनी केला . ग्रामस्थांच्या प्रसंगावधनामुळे जीवीतहानी झाली नाही .

 

Web Title: Two houses caught fire due to short circuit in Kote