श्री विद्याकोटी कुंकूमार्चन महायज्ञ उद्यापासून कोल्हापुरात; स्वामी अभिषेक ब्रम्हचारी यांची उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:12 IST2026-03-19T16:11:58+5:302026-03-19T16:12:22+5:30

ललितास्त्रनामची १ कोटी आवर्तने

Two day Shri Vidyakoti Kumkumarchan Mahayagya in Kolhapur under the guidance of Swami Abhishek Brahmachari | श्री विद्याकोटी कुंकूमार्चन महायज्ञ उद्यापासून कोल्हापुरात; स्वामी अभिषेक ब्रम्हचारी यांची उपस्थिती 

श्री विद्याकोटी कुंकूमार्चन महायज्ञ उद्यापासून कोल्हापुरात; स्वामी अभिषेक ब्रम्हचारी यांची उपस्थिती 

कोल्हापूर : त्रिपूरसुंदरी श्री ललितामाता चे उपासक, यज्ञसम्राट स्वामी अभिषेक ब्रम्हचारी यांच्या पवित्र सानिध्यात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात प्रथमच शुक्रवार (दि.२०) व शनिवारी (दि.२१) श्री विद्याकोटी कुंकूमार्चन महायज्ञ होणार आहे. आयटी पार्क येथील विश्वपंढरी येथे सकाळी ९ वाजल्यापासून या महायज्ञाला सुरुवात होईल. यात श्री ललितासहस्त्रनामाची एक कोटीहून अधिक आवर्तने व कुंकूमार्चन विधी होणार असून शहरातील महिला, मुली सहभागी होणार आहेत.

अध्यात्म ही भारताला लाभलेली अलाौकिक देणगी आहे. देवादिकांची उपासना, मंत्रोच्चार, महायज्ञ अशा धार्मिक विधींनी आपल्याभोवती कायम दैवी शक्तींचे सकारात्मक उर्जा अस्तित्व जाणवते. स्वामी अभिषेक ब्रम्हचारी म्हणजे याच अध्यात्मिक परंपरेचे वाहक, श्री ललितामातेचे उपासक, अध्यात्मातून देशाची प्रगती, विश्वशांती, गरीबांचे कल्याण व्हावे या उद्देशातून त्यांनी देशभरात कश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत ४२ ठिकाणी श्री विद्याकोटी कुंकूमार्चन महायज्ञ केले असून त्या माध्यातून १२० कोटी वेळा श्री ललितासहस्त्रानामची आवर्तने झाली आहेत. याआधी महाराष्ट्रात मुंबईत तीन वेळा हे महायज्ञ झाले असून आता काेल्हापुरात चौथे यज्ञ होत आहे.

त्यासाठी काशीहून ७ ते ८ उच्चविद्याविभूषित वेदमूर्ती येत आहेत. स्वामी अभिषेक ब्रम्हचारी हे ऋषी व कृषी परंपरा नव्या पिढीत रुजावी, त्यांना श्री विद्या सनातन धर्माचे ज्ञान मिळावे, पौराणिक शिक्षण परंपरा समजून घ्यावी, राष्ट्र निर्माणासाठी युवा पिढीने सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी प्रयत्नशिल आहेत. वंचित लहान मुलांचे शिक्षण, महिला सबलीकरणाचेही कार्य ते करत आहेत. गोमाता संरक्षणासाठीच्या अभियानात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये श्री विद्याकोटी कुंकूमार्चन महायज्ञ व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. कोल्हापुरात या महायज्ञाचे संयोजन जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी हे करत आहेत. सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत कुुंकूमार्चन महायज्ञ व त्यानंतर विविध प्रकारचे पूजन, उपासना, सेवा, भजन असे धार्मिक उपक्रम होणार आहेत. महिला, युवतींना या महायज्ञात निशुल्क प्रवेश असून त्यांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title : कल से कोल्हापुर में श्री विद्याकोटी कुंकुमार्चन महायज्ञ; स्वामी अभिषेक उपस्थित

Web Summary : स्वामी अभिषेक ब्रह्मचारी के नेतृत्व में कोल्हापुर में श्री विद्याकोटी कुंकुमार्चन महायज्ञ आयोजित किया जाएगा। इस कार्यक्रम में ललिता सहस्रनाम का पाठ होगा और इसका उद्देश्य वैश्विक शांति और महिला सशक्तिकरण है। यह आईटी पार्क के विश्व पंढरी में आयोजित किया जाएगा।

Web Title : Shri Vidyakoti Kunkumarchan Mahayagya in Kolhapur from tomorrow; Swami Abhishek present.

Web Summary : Kolhapur to host Shri Vidyakoti Kunkumarchan Mahayagya led by Swami Abhishek Brahmachari. The event features Lalita Sahasranama recitations and aims for global peace and women empowerment. It will be held at IT Park's Vishwa Pandhari.