राजेंद्रनगर येथे दहीहंडी कार्यक्रमात दोघा भावांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:42 IST2019-08-26T15:39:49+5:302019-08-26T15:42:05+5:30
कोल्हापूर : राजेंद्रनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलजवळ दहिहंडीचा कार्यक्रम घेतले प्रकरणी दोघा भावांना बेदम मारहाण केली. पवन सुरेश परदेशी ...

राजेंद्रनगर येथे दहीहंडी कार्यक्रमात दोघा भावांना मारहाण
कोल्हापूर : राजेंद्रनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलजवळ दहिहंडीचा कार्यक्रम घेतले प्रकरणी दोघा भावांना बेदम मारहाण केली. पवन सुरेश परदेशी (वय १८), त्याचा भाऊ राकेश (२०) अशी जखमीची नावे आहेत. याप्रकरणी राजारामपुरी पोलीसांनी संशयित महेश मंगल जाधव (२२), विश्वनाथ मंगल जाधव (३०, रा. राजेंद्रनगर) यांचेवर गुन्हा दाखल केला. २४ आॅगस्टला ही घटना घडली.
राजेंद्रनगर येथे पवन परदेशी व त्याचा भाऊ राकेश यांनी दहिहंडीचा कार्यक्रम घेतला होता. महापुरामुळे शहरातील अनेक दहिहंडीचे कार्यक्रम रद्द केले होते. गल्लीत ध्वनीक्षेप लावून दंगा सुरु झाल्याने संशयित महेश व विश्वनाथ यांनी पवनला दहिहंडीचा कार्यक्रम बंद करण्यास सांगितला. त्यातुन झालेल्या वादातून त्यांनी परदेशी बंधूंना मारहाण केली. दोघांवरही सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. सोमवारी संशयित जाधव बंधूंना पोलीसांनी ताब्यात घेतले.