Two arrested for gang-rape of a foreigner | परप्रांतीय विवाहितेवर सामूहिक अत्याचारप्रकरणी दोघे अटक

परप्रांतीय विवाहितेवर सामूहिक अत्याचारप्रकरणी दोघे अटक

ठळक मुद्देपरप्रांतीय विवाहितेवर सामूहिक अत्याचारप्रकरणी दोघे अटकचार संशयितांवर गुन्हे

कोल्हापूर : मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन आसाम येथील गर्भवती महिलेवर विविध ठिकाणी नेऊन सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक केली. रामकरण बंसीधर योगी (वय ३५, रा. बिरणाटनगर, राज्यस्थान), दिलीप रामेश्वर योगी (३०, रा. झाडलीपुराणी, सिक्कर, राजस्थान. सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आसाम येथील पीडित विवाहितेला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण केले होते. तिच्या तीन वर्षांच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन तिला रामकरण योगी याच्याशी विवाह करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेवर आसामसह राजस्थान व कोल्हापुरात सामूहिक अत्याचार करण्यात आले.

पाचगाव (ता. करवीर) येथे भाड्याने राहत असताना पीडित महिलेने शेजाऱ्यांच्या मदतीने रविवारी रात्री करवीर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याप्रकरणी पोलीस ठाण्यात काजल शंकर योगी, रामकरण बंसीधर योगी (वय ३५, दोघेही रा. बिरणाटनगर, राज्यस्थान), दिलीप रामेश्वर योगी (३०), सीमा दिलीप योगी (२२ दोघे मूळ गाव राजस्थान, सध्या रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) या चार संशयितांवर गुन्हे नोंदवले होते. त्या प्रकरणी सोमवारी पोलिसांनी रामकरण योगी व दिलीप योगी यांना अटक केली. पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर करत आहेत.

Web Title: Two arrested for gang-rape of a foreigner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.