इचलकरंजी : एका प्रेमप्रकरणाच्या वादातून ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक सांगलवाडी) याच्यावर इचलकरंजीत गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. दोघांना न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी सुनावली.अनुराग अमोल सूर्यवंशी (२०, रा. शिकलगार हाऊस पुजारी मळा) व ओमकार संजय शेंडे (रा. यशवंत कॉलनी) अशी दोघांची नावे आहेत. त्यांना शहरातील पंचगंगा नदीघाट परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कौस्तुब निखिल गोंधळे (२०, रा. सिद्धार्थ परिसर सांगली) याने फिर्याद दिली आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी कबुली दिली आहे. त्यामध्ये दुचाकीवरून ओंकार कांबळे व कौस्तुभ गोंधळे हे दोघे जयसिंगपूरकडे निघाले होते. सांगली रोडवरील शिक्षक पतसंस्थेजवळ दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांपैकी पाठीमागे बसलेल्या अनुराग सूर्यवंशी व ओमकार शेंडगे यांनी कांबळे याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. त्यामध्ये एक गोळी ओंकार याच्या बरगडी आणि पोटामध्ये घुसल्याने तो जखमी झाला. जखमी कांबळे याच्यावर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना अनुराग व ओमकार हे दोघेही संशयित पंचगंगा नदी रेणुका मंदिर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांना तेथून ताब्यात घेतले. त्यांना गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश चव्हाण करीत आहेत.
Web Summary : Two arrested in Ichalkaranji for shooting Omkar Kamble over a love affair dispute. The victim was shot on Sangli Road and is currently hospitalized in Kolhapur. Police investigation is ongoing.
Web Summary : इचलकरंजी में प्रेम प्रसंग के विवाद में ओंकार कांबले पर गोली चलाने के आरोप में दो गिरफ्तार। सांगली रोड पर पीड़ित को गोली मारी गई, कोल्हापुर के अस्पताल में इलाज जारी। पुलिस जांच जारी है।