शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime News: नोकरीचे आमिष दाखवून ४२ लाखांची फसवणूक, दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:00 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघांची ४२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी दोघांना सोमवारी (दि. १६) अटक केली. राजेंद्र मनोहर पाटील (वय ७०, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) आणि राजू दत्तात्रय सरनाईक (५४, रा. फुलेवाडी पाचवा बस स्टॉप), अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.याबाबत संजय वसंत सनगर (५६, रा. फुलेवाडी) यांनी शनिवारी (दि. १४) फिर्याद दिली होती. अटकेतील राजेंद्र पाटील आणि राजू सरनाईक यांनी ११ लाख रुपये घेऊन फिर्यादी सनगर यांच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. तसेच श्रीकांत सनगर यांच्याकडून १० लाख ६० हजार, एकनाथ गडकर यांच्याकडून १३ लाख ५४ हजार आणि प्रकाश भरणकर यांच्याकडून आठ लाख सात हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.या दोघांनाही पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीत त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी आणखी कोणाकडून पैसे घेतले असल्यास संबंधितांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Job Racket Busted, Two Arrested for ₹4.2 Million Fraud

Web Summary : Two individuals were arrested in Kolhapur for defrauding four people of ₹4.2 million by promising government jobs. The accused, Rajendra Patil and Raju Sarnaik, lured victims with false promises, taking money from each. Police urge others who may have been victimized to come forward and file complaints.