Kolhapur: जुळ्या बहिणीचे लख्ख यश; आर्याला ९६ तर आदितीला ९५.२० टक्के गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:13 IST2025-05-14T12:11:33+5:302025-05-14T12:13:32+5:30

आर्या इंग्रजीत मुरगूड केंद्रात पहिली तर आदिती टेक्निकल विषयात १०० गुण मिळवून राज्यात प्रथम 

Twin sisters Arya and Aditi Anil Patil from Murgud scored 96 and 95 percent marks respectively in the 10th standard examination | Kolhapur: जुळ्या बहिणीचे लख्ख यश; आर्याला ९६ तर आदितीला ९५.२० टक्के गुण

Kolhapur: जुळ्या बहिणीचे लख्ख यश; आर्याला ९६ तर आदितीला ९५.२० टक्के गुण

सेनापती कापशी: मुरगूड येथील (मूळगाव यमगे, ता. कागल) आर्या आणि आदिती अनिल पाटील या जुळ्या बहिणींनी दहावीच्या परीक्षेत लख्ख यश मिळवले. आर्याला ९६ तर आदितीला ९५.२० टक्के गुण मिळाले. आर्याने इंग्रजी ला ९६ गुण मिळवून मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला. तर आदितीने टेक्निकल या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. लोकमतचे मुरगूड वार्ताहर अनिल पाटील यांच्या त्या कन्या आहेत.

आर्या आणि आदिती लहानपणापासूनच हुशार. आतापर्यंत सर्वच इयत्ते मध्ये त्या पहिल्या तीन क्रमांकात नेहमी यशस्वी होत होत्या. पहिली ते चौथी पर्यंत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊन पाचवीला मुरगूड विद्यालयात सेमी माध्यमामध्ये शिक्षण घेतले. आर्याने आयआयटी'मध्ये तर आदितीने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा मनोदय बोलून दाखवला. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, प्राचार्य एस. पी. पाटील, उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी यांचे प्रोत्साहन व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Twin sisters Arya and Aditi Anil Patil from Murgud scored 96 and 95 percent marks respectively in the 10th standard examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.