शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तास पाणी देणारे फसवणुकीचे नऊ हजारांचे ‘मीटर’

By admin | Updated: August 14, 2015 00:07 IST

नवा फंडा : महापालिकेचीच योजना असल्याचे भासवून लूट; नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन

कोल्हापूर : तुमच्या नळाला चोवीस तास पाणी येईल. त्यासाठी आम्ही खास मीटर बसवून देतो. त्यासाठी फक्त नऊ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगून काही भामटे लोकांची फसवणूक करीत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. गुरुवारी सकाळी पांजरपोळच्या मागील बाजूस असलेल्या केशव स्मृती अपार्टमेंटमध्ये असाच एक भामटा गेला होता; परंतु तेथील सजग नागरिकांमुळे कुणाची फसवणूक झाली नाही.हे भामटे सर्वप्रथम ज्यांच्या घरी जाणार, त्यांच्या घरी अगोदर फोन करतात. महापालिकेतून उपअभियंता कुलकर्णी, गायकवाड बोलतो असे सांगतात व असे मीटर बसवायचे आहे का, म्हणून विचारणा करतात. मुख्यत: अपार्टमेंट, हॉटेल व रुग्णालयात जाऊन हे लोक असे आमिष दाखवितात. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारासही असाच एकजण केशव स्मृती अपार्टमेंटमध्ये गेला. त्याचा गणवेश खाकी होता. हातात महापालिका कर्मचाऱ्याच्या हातात असते तसे बिलिंग बुकही होते. कॅनरा बँकेत नोकरी करणाऱ्या शाल्मली देशपांडे यांच्या घरी जाऊन त्याने हे आमिष दाखविले. तिथे असतानाच त्याला कुणाचा तरी फोन आला व मीटर लगेच बसवून देत असल्याचे त्याने खोटेच सांगितले. श्रीमती देशपांडे या चौकस असल्याने त्यांना या भामट्याबद्दल शंका आली. वृत्तपत्रांत अशी महापालिकेची कोणतीही योजना असल्याचे आपण वाचलेले नाही; त्यामुळे त्यांचा यावर विश्वास बसला नाही आणि नुसतेच मीटर बसविल्यावर नळाला चोवीस तास पाणी कसे येणार, अशीही शंका त्यांना आली. त्याने अगोदरच देशपांडे यांचा पाण्याच्या मीटरचा नंबर आणला होता. या भागातील महापालिकेच्या मीटर रीडरची बावड्याला बदली झाल्याने मी नवीन आलो आहे, असेही तो सांगत होता. त्यांनी अपार्टमेंटमधील अन्य महिलांना सांगून त्या व्यक्तीची चौकशी सुरू केल्यावर तो तातडीने तेथून पसार झाला. आमच्याकडेही लोकांच्या तक्रारी : जल अभियंताअशा पद्धतीने फसवणूक झालेल्या लोकांच्या आमच्याकडेही तक्रारी आल्या असल्याचे महापालिकेचे जल अभियंता मनीष पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘आम्ही वृत्तपत्रांत जाहिरात देऊन अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहनही केले आहे.’ गेल्या तीन-चार महिन्यांपासून वेगवेगळ्या भागांतून अशा तक्रारी येत आहेत. मध्यंतरी एकास नागरिकांनी पकडले होते; परंतु ज्यांची फसवणूक झाली होती, त्यांचे त्याने घेतलेले पैसे परत दिल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी पाळत ठेवून एका नागरिकास फोन आल्यावर पैसे द्यायची तयारी दाखविली. त्याला विशिष्ट ठिकाणी यायला सांगितल्यावर त्याला संशय आला व तो पैसे न्यायला आलाच नाही, असेही मनीष पवार यांनी सांगितले.