टस्कर हत्ती आजरा शहरात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 14:52 IST2020-10-12T14:50:55+5:302020-10-12T14:52:51+5:30
wildlife, forest department, kolhapurnews गेली आठ वर्षे आजरा तालुक्यात धुमाकूळ घालणारा टस्कर हत्ती पहाटे पाच वाजता आजरा शहरात दाखल झाला. शहरातील नबापूर गल्लीतून टस्करांने फेरफटका मारला.

टस्कर हत्ती आजरा शहरात दाखल
ठळक मुद्देटस्कर हत्ती आजरा शहरात दाखलनबापूर गल्लीतून मारला फेरफटका
सदाशिव मोरे
आजरा -गेली आठ वर्षे आजरा तालुक्यात धुमाकूळ घालणारा टस्कर हत्ती पहाटे पाच वाजता आजरा शहरात दाखल झाला. शहरातील नबापूर गल्लीतून टस्करांने फेरफटका मारला.
सकाळी ग्रामसेवक फिरायला गेले असता त्यांनी हत्तीच्या आवाजाच्या दिशेने बॅटरीचा फोकस टाकला. तर दहा फुटांवर टस्कर हत्ती दिसला. त्यांनी तातडीने गल्लीतील लोकांना उठविले.
नबापूर गल्लीत दुचाकी, चारचाकी गाड्यांसह अन्य कोणत्याही वस्तूंचे नुकसान केलेले नाही. मात्र परत जाते वेळी ऊस, भात, केळी पिकाचे नुकसान करीत साळगावच्या जंगलात गेला आहे.