तुषार ठोंबरे यांची बीड अप्पर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 13:12 IST2020-05-01T13:10:50+5:302020-05-01T13:12:21+5:30
महसूल विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीपर बदल्यांचे आदेश काढले

तुषार ठोंबरे यांची बीड अप्पर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती
कोल्हापूर : मंत्रालयातील महसूल विभागाकडून राज्यातील पदोन्नतीस पात्र असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांची अप्पर जिल्हाधिकारीपदी बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये कोल्हापूरचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे यांची बीड येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे.
महसूल विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीपर बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये ठोंबरे यांच्यासमवेत कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी राहिलेले शंकर बर्गे, राधानगरी प्रांताधिकारी राहिलेले त्रिगुण कुलकर्णी यांचा समावेश आहे.