शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘चार्टर्ड अकाउंटंटस्‌‌ कोल्हापूर’च्या अध्यक्षपदी तुषार अंतूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST

कोल्हापूर : दी इन्स्टिट्यट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस्‌ ऑफ इंडिया (आय.सी.ए.आय.) कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी सीए तुषार अंतूरकर यांची, तर उपाध्यक्षपदी ...

कोल्हापूर : दी इन्स्टिट्यट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस्‌ ऑफ इंडिया (आय.सी.ए.आय.) कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी सीए तुषार अंतूरकर यांची, तर उपाध्यक्षपदी सुशांत गुंडाळे यांची निवड झाली. या इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी समितीची बैठक शनिवारी झाली. त्यामध्ये २०२१-२०२२ या वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

चेतन ओसवाल यांची सचिवपदी, तर अमित शिंदे यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली. मावळते अध्यक्ष अनिल चिकोडी यांच्याकडून अंतूरकर यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी समितीचा कार्यकाळ हा त्रैवार्षिक असतो. त्यामध्ये दरवर्षी पदाधिकाऱ्यांची फेरनिवड करण्यात येते. व्यावसायिक, नोकरदार वर्ग, मध्यम व लघु उद्योजकांना येणाऱ्या आयकर आणि वस्तू व सेवाकरविषयक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. सीए सभासदांच्या उपयुक्ततेचे विविध कार्यक्रम वर्षभरात घेतले जातील. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम आणि परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. विविध शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सीए अभ्यासक्रमाबाबत जागरूकता केली जाईल, असे अंतूरकर यांनी सांगितले. दरम्यान, आय.सी.ए.आय. कोल्हापूर शाखेची स्थापना सन १९८१ मध्ये झाली आहे. या शाखेशी ६०० सभासद आणि ३००० विद्यार्थी संलग्न आहेत.

फोटो (०३०३२०२१-कोल-तुषार अंतुरकर (प्रेसिडेंट), सुशांत गुंडाळे (व्हाईस प्रेसिडेंट)