शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

फसवणूक प्रकरणातील व्हिजन ॲग्रोच्या तुकाराम पाटीलला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:05 AM

Crimenews Fraud, Kolhapur- गुंतविलेल्या पैशांवर अधिक नफा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील व्हिजन ग्रीन ॲग्रो प्रॉडक्टस्‌ लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रॉडक्टस्‌ कंपनीचा पसार झालेला संचालक डॉ. तुकाराम शंकर पाटील (४०, रा. माजगाव, ता. पन्हाळा) यास सोमवारी अटक केली.

ठळक मुद्देफसवणूक प्रकरणातील व्हिजन ॲग्रोच्या तुकाराम पाटीलला अटककोतोली फाटा येथे कारवाई; प्रसाद पाटीलचा शोध सुरूच

 कोल्हापूर : गुंतविलेल्या पैशांवर अधिक नफा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील व्हिजन ग्रीन ॲग्रो प्रॉडक्टस्‌ लिमिटेड व व्ही ॲण्ड के ॲग्रोटेक प्रॉडक्टस्‌ कंपनीचा पसार झालेला संचालक डॉ. तुकाराम शंकर पाटील (४०, रा. माजगाव, ता. पन्हाळा) यास सोमवारी अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतोली फाटा येथे सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. आतापर्यंत याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. डॉ. पाटील याला आज, मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.व्हिजन ॲग्रो कंपनीच्या नावाखाली गुंतवणूक केलेल्या पैशांवर नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसात मुख्य सूत्रधार विकास खुडेसह संचालकांवर गुन्हे दाखल होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला. त्यांनी मुख्य सूत्रधार विकास खुडे, सुशील शिवाजी पाटील (यवलूज, ता.पन्हाळा) याला यापूर्वीच अटक केली आहे, तर डॉ. तुकाराम पाटील हा पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा येथे येणार असल्यााची माहिती खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांना मिळाली.

त्यावेळी पो. नि. अशोक इंदलकर, सहायक फौजदार दिलीप कारंडे, हवालदार दिनेश उंडाळे आदींनी कोतोली फाटा येथे सापळा रचून त्याला अटक केली. खुडे हा सध्या कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कंपनीचा संचालक प्रसाद आनंदराव पाटील (रा. निवृत्ती चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याचाही पोलीस शोध घेत आहेत.संशयितांकडून तब्बल ३० लाखांची मालमत्ता जप्तआर्थिक गुन्हे पोलीस पथकाने आतापर्यंत संशयित आरोपींकडून २३ तोळे सोने, दोन चारचाकी आलिशान मोटार, दुचाकी, लॅपटॉप, कॉम्प्युटर असा सुमारे ३० लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांकडून फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा शोध सुरू असून ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूर