महापालिकेच्यावतीने महात्मा गांधी यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 15:00 IST2021-01-30T14:59:01+5:302021-01-30T15:00:46+5:30
Mahatma Gandhi Muncipalty Kolhapur- महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयास उप-आयुक्त निखील मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास उपायुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कोल्हापूर : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने गांधी मैदान वरुणतिर्थवेश येथील महात्मा गांधी यांच्या पुतळयास उप-आयुक्त निखील मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी उपशहर अभियंता एन. एस. पाटील, चंद्रकांत यादव, राजाराम धनवडे, जनार्दन ढपळे, विजय लोखंडे, राजू मगदुम व कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर शहर काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी यांना अभिवादन
कोल्हापूर शहर काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन कोल्हापूर शहरचे आमदार चंद्रकांत जाधव आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण हे होते. या वेळी विविध पदाधिकारी यांनी महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमास सुरेश कुऱ्हाडे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे सचिव संजय पोवार वाईकर, ब्लॉक अध्यक्ष किशोर खानविलकर, महंमद शरीफ शेख, संपत पाटील, दीपक थोरात, उदय पोवार, स्वप्नील सावंत,अक्षय शेळके, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, वैशाली पाडेकर, हेमलता माने, पूजा आरडे, रंगराव देवणे, रणजित पवार, मतीन शेख, मोहन पोवार, शोभा पाटील,निर्मला सालधाना,अनवर शेख, गजगेश्वर, बाळासाहेब जगदाळे, यशवंत थोरवत, अन्सार देसाई, रशीद ढालयीत, गोपाळ पाटील, अरुण कदम, तानाजी लांडगे, नारायण लोहार, सुभाष देसाई, परवेज सय्यद, निशिकांत दिवाण, बाबुराव कांबळे, आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते,