सांगली- कोल्हापूर राज्यमार्गावरील वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 14:26 IST2021-07-27T14:25:30+5:302021-07-27T14:26:26+5:30
Flood Kolhapur Sangli Road : गेले तीन बंद असणारा सांगली कोल्हापूर राज्य मार्ग सुरू करण्यात आला आहे. महापुरामुळे हा मार्ग बंद झाला होता. मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान उदगाव (ता. शिरोळ) येथील रेल्वे ब्रिजजवळील पाण्याची पातळी एक फुटावर आल्याने सुरवातीला अवजड व अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडण्यात आली.

महापुरामुळे गेले तीन बंद असणारा सांगली कोल्हापूर राज्य मार्ग सुरू करण्यात आला आहे. (छाया : अजित चौगुले, उदगाव)
उदगाव : गेले तीन बंद असणारा सांगलीकोल्हापूर राज्य मार्ग सुरू करण्यात आला आहे. महापुरामुळे हा मार्ग बंद झाला होता. मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान उदगाव (ता. शिरोळ) येथील रेल्वे ब्रिजजवळील पाण्याची पातळी एक फुटावर आल्याने सुरवातीला अवजड व अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडण्यात आली.
दरम्यान, वाहतूक सुरू झाल्यानंतर महामार्गावर थांबून असलेले मोठमोठे ट्रक, डंपर ,ऑइल टँकर यांची संख्या जास्त असल्याने वाहतूक अगदी संथ गतीने सुरू होती.दुपारी बारा नंतर सर्व वाहनांना वाहतूक खुली झाली आहे. या ठिकाणी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यासह पथक उपस्थित आहे.