वळीवाचा पाऊस पाठ सोडेना: सलग चौथ्या दिवशी झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 19:55 IST2021-04-13T19:53:49+5:302021-04-13T19:55:03+5:30

Rain Kolhapur : पाडव्याची गुढी आणि पावसाची उडी या पारंपरिक म्हणीची प्रचिती मंगळवारी कोल्हापुरकरांनाही आली. गुढी उतरवण्याच्या वेळेस विजांच्या कडकडाटासह आलेल्या वळवाच्या पावसाने अक्षरशा झोडपून काढले. लॉकडाऊनच्या भीतीने आणि पाडव्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांचीही पावसाने चांगलीच फजिती केली.

The torrential rains did not stop: it rained for the fourth day in a row | वळीवाचा पाऊस पाठ सोडेना: सलग चौथ्या दिवशी झोडपले

कोल्हापुरात सलग चौथ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी वळवाच्या पावसाने हजेरी लावली. गुढी पाडव्याच्या खरेदीचा उत्साह सुरु असताना आलेल्या या पावसाने नागरीकांची फजिती केली. पावसात भिजू नये म्हणून खरेदीसाठी आणलेली पिशवीच डोक्यावर धरुन घर गाठावे लागले. (छाया: नसीर अत्तार)

ठळक मुद्देवळीवाचा पाऊस पाठ सोडेनासलग चौथ्या दिवशी झोडपले

कोल्हापूर: पाडव्याची गुढी आणि पावसाची उडी या पारंपरिक म्हणीची प्रचिती मंगळवारी कोल्हापुरकरांनाही आली. गुढी उतरवण्याच्या वेळेस विजांच्या कडकडाटासह आलेल्या वळवाच्या पावसाने अक्षरशा झोडपून काढले. लॉकडाऊनच्या भीतीने आणि पाडव्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांचीही पावसाने चांगलीच फजिती केली.

गेल्या चार दिवसापासून वळीवाच्या पावसाने जिल्ह्यात मुक्कामच ठोकला आहे. दुपारनंतर पाऊस येणार हे ठरलेलेच आहे. मंगळवारी देखील सकाळपासून प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात सरी कोसळण्यास सुरुवात झाली. शहरात साडेपाचलाच पाऊस सुरु झाला. सुरुवातीला हलक्या वाटणाऱ्या सरींनी नंतर मात्र चांगलाच जोर धरला.

उद्यापासून लॉकडाऊन लागेल या भीतीने खरेदीसाठी लोक दुपारपासून घरातून बाहेर पडले होते. पाडवा असल्याने खरेदीचा मुहूर्त साधायचा म्हणूनही लोक सहकुटूंब खरेदीसाठी बाहेर पडले होते. कोरोनाचे निर्बंध असतानाही लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाकडून निर्बंधाची वारंवार आठवण करुन दिली तरी लोक ऐकत नव्हते, पण संध्याकाळी आलेल्या पावसाने एका दमात सर्वांना घरात बसवले. खरेदीच्या उत्साहावरही पाणी पडल्याने विक्रेत्यांचा मात्र हिरमोड झाला.
 

Web Title: The torrential rains did not stop: it rained for the fourth day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.