शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

पदवीधर, शिक्षकसाठी इच्छुकांच्या उद्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 15:19 IST

politicis, Satej Gyanadeo Patil, elecation, congres, kolhapurnews पुणे पदवीधर, शिक्षक निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असून  उद्या निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील या दोन्ही मतदारसंघांतील काँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी दुपारी काँग्रेस समितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपदवीधर, शिक्षकसाठी इच्छुकांच्या उद्या मुलाखतीपालकमंत्री पाटील यांची माहिती : जागावाटपाचा उद्यापर्यंत निर्णय

कोल्हापूर : पुणे पदवीधर, शिक्षक निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असून  उद्या निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील या दोन्ही मतदारसंघांतील काँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी दुपारी काँग्रेस समितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री पाटील म्हणाले, अचानक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने हातात फारच कमी वेळ राहिला आहे. या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढतील, असे वरिष्ठ पातळीवर ठरले आहे. जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू असून दोन दिवसांत अंतिम तोडगा निघणार हे. हा निर्णय राज्यासाठी असल्याने कोणी कोणत्या जागा लढवायच्या याचा निर्णय देखील याच बैठकीत अपेक्षित आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह घटकपक्ष ही निवडणूक एकदिलाने लढविणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, गुलाबराव घोरपडे आदी प्रमुख उपस्थित होते.इच्छुकांची संख्या मोठीपुणे विभागातंर्गत येणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या सर्वांचे मागणी अर्ज पक्षाकडे आले आहेत. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या पाच जिह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती उद्या, गुरुवारी कोल्हापुरात होणार आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील,बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीत मुलाखती होणार आहेत.महाविकास विरुद्ध भाजप सामनामहाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट केल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आघाडी असाच सामना रंगणार आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेला वर्षपूर्ती होत असतानाच पहिल्यांदाच महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने या आघाडीसाठी ही निवडणूक लिटमस टेस्टच असणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरPuneपुणेPoliticsराजकारण