शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

‘टोलविरोधीं’नी गटारी पाडल्या उघड्या

By admin | Updated: December 16, 2014 23:33 IST

बंदिस्त गटारीत घाण : आरोग्य अधिकारी धारेवर; कृती समितीने केली राजारामपुरी परिसरात पाहणी

कोल्हापूर : राजारामपुरी परिसरातील बंदिस्त असलेल्या गटारींची पाहणी करण्यासाठी आज, मंगळवारी गेले असता सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रभारी मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांना धारेवर धरले. यावेळी कार्यकर्त्यांनी या दोन अधिकाऱ्यांसमोर आयआरबी कंपनीवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.शहरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून या कंपनीने रस्ते केले. रस्त्याच्या दुतर्फा बंदिस्त गटारी बांधल्या. पण, या गटारीमधील घाण अथवा कचरा काढण्यात आलेला नाही. याप्रश्नी आज राजारामपुरी मारुती मंदिरासमोरील मोठ्या बंदिस्त गटारीचे झाकण कार्यकर्त्यांनी दुपारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या समोर काढले. यावेळी कचरा व प्लास्टिक साहित्य दिसल्यावर कार्यकर्त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्यावर आगपाखड केली. पेट्रोल पंपाच्या दारातील तसेच दौलतनगरमधील गोखले विद्यालयासमोरील मोठ्या गटारीची अवस्था यापेक्षाही वेगळी होती. ही गटारेच मुजली होती. त्यामुळे सांडपाणी घरात येत असल्याच्या तक्रारीचा पाढा नागरिकांनी आरोग्य अधिकाऱ्यांसमोर मांडून आरोग्य निरीक्षक, मुकादम यांना जाब विचारला. त्यानंतर सर्वजण राजारामपुरी पोलीस ठाण्यात आले. कार्यकर्त्यांनी डॉ. दिलीप पाटील यांच्याकडे आयआरबीवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.यामध्ये बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, अशोक पोवार, महादेव पाटील, दिलीप पवार, प्रसाद पाटील, महेश सासने, वैशाली महाडिक, चारुलता चव्हाण, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, श्रीकांत भोसले, सुरेश जरग आदींचा सहभाग होता.