शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षांवर आज ‘अविश्वास’?

By admin | Updated: July 14, 2015 19:50 IST

इचलकरंजी नगरपालिका : जिल्हाधिकाऱ्यांना आज दोन्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटणार

इचलकरंजी : नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची पूर्वतयारी म्हणून कॉँग्रेसने त्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. पालिका सभागृहात त्यांच्या विरोधात बहुमत असतानाही नगराध्यक्षांनी गुरूवार (९ जुलै) च्या सभेत ११ विषय कोणत्याही चर्चेविना मंजूर करून घेतले, अशी तक्रार मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याकडे करण्यात आली. तर आज, बुधवारी जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांना भेटून दोन्ही कॉँग्रेसकडून त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची शक्यता आहे.आपण कॉँग्रेसच्या आहोत, असे म्हणत नगराध्यक्षा बिरंजे यांचा कल शहर विकास आघाडीच्या बाजूनेच असल्याचे निदर्शनात आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून कॉँग्रेस व त्यांच्यात शीतयुद्ध चालू होते. अशा पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कॉँग्रेसच्या शहर कार्यालयात झालेल्या मेळाव्यांमध्ये नगराध्यक्षांवरील अविश्वासाविषयी सुतोवाच केले आणि नगराध्यक्षा व कॉँग्रेस यांच्यातील दुराव्याला उघड स्वरूप प्राप्त झाले.गुरूवारी (९ जुलै) झालेल्या नगरपालिकेच्या सभेत आयजीएम दवाखाना पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा विषय सभेच्या पत्रिकेवर असला, तरी तो ‘पुढील सभे’ ला करण्यात येईल, असा ‘शविआ’कडून निरोप आला होता; पण तो शब्द फिरविला. त्यामुळे या विषयावर मतदान घेण्याचा आग्रह कॉँग्रेसने धरला. त्यामुळे आयजीएम दवाखाना पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा विषय २९ विरूद्ध १७ मतांनी फेटाळला. मग पुढे मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी सभागृहाबाहेर जाताना नगराध्यक्षा बिरंजे यांनी ‘शविआ’ चे पक्षप्रतोद अजित जाधव यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविले. उपनगराध्यक्ष सभागृहात असताना त्यांना डावलून जाधव यांना मान दिल्याने मानापमानाचे नाट्य रंगले. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. या गोंधळात सभेतील ११ विषय नगराध्यक्षांनी मंजूर झाल्याचे घोषित केले.सदरच्या ११ विषयांची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी त्याबरोबर गटनेते बाळासाहेब कलागते, पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते, आरोग्य सभापती सुजाता भोंगाळे, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. दरम्यान, अशाच आशयाचे निवेदन शहर कॉँग्रेस व कॉँग्रेसच्या नगरसेवकांच्यावतीने आज, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यावेळी नगराध्यक्षा बिरंजे यांच्यावरील अविश्वासही दाखल होण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) वर्ष होत असल्याने हालचाली तीव्रनगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी जानेवारी महिन्यात राजीनामा देण्यास नकार दिला आणि बंड केले. एक वर्षाची मुदत भरण्यापूर्वी नगराध्यक्षांवर अविश्वास आणता येत नाही, असे कायद्याचेच संरक्षण नगराध्यक्षांना असल्याने त्यावेळी बिरंजे यांच्यावर अविश्वास आणता आला नाही. त्यांना आता १५ जुलैला एक वर्ष पूर्ण होत असल्याने आता नगराध्यक्षा बिरंजे यांच्यावर अविश्वासाच्या हालचालींना तीव्रता आली आहे.