शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या विरोधात आज यंत्रमागधारकांचा मोर्चा

By admin | Updated: August 27, 2015 23:56 IST

सुधारित किमान वेतन प्रश्न : इचलकरंजीतील मेळाव्यात घोषणा

इचलकरंजी : शासनाने अव्यवहार्य किमान वेतन जाहीर केले असल्याने अव्यवहार्य सुधारित किमान वेतनामुळे यंत्रमाग उद्योगाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. म्हणून शासनाच्या विरोधात आणि उच्च न्यायालयात व्यवहार्य किमान वेतन सादर करण्याच्या मागणीसाठी आज, शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयावर यंत्रमागधारकांचा मोर्चा काढण्याचा निर्णय इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी घोषित केला.यंत्रमाग उद्योगामधील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने गेले ३८ दिवस संप सुरू ठेवला आहे. ८० टक्के यंत्रमाग कारखाने बंद पडल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर गुरुवारी इचलकरंजीतील यंत्रमागधारकांच्या पाचही संघटनांनी औद्योगिक वसाहतीमधील कल्याण केंद्राच्या आवारात मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कोष्टी होते.सतीश कोष्टी म्हणाले, पॉवरलूम असोसिएशनने किमान वेतनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अशा अव्यवहार्य किमान वेतनामुळे यंत्रमाग उद्योग मोडून पडेल, याबाबतची कल्पना आमदार सुरेश हाळवणकर, पालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, तसेच कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनासुद्धा दिली आहे. सागर चाळके म्हणाले, सध्या आपण कामगारांना सहा हजार ९०० रुपये देत असताना शासनाने अचानकच दहा हजार ५७३ रुपये घोषित करून कारखानदारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योगाच्या अस्तित्वासाठी आजच्या मोर्चामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याबरोबर आमदार सुरेश हाळवणकर यांनीसुद्धा सहभागी व्हावे.शेट्टी व मंत्री पाटील यांच्यावर टीकागुरुवारच्या मेळाव्यामध्ये काही वक्त्यांनी खासदार राजू शेट्टी यांना यंत्रमाग उद्योगावरील संकटाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे वस्त्रोद्योग खाते असूनसुद्धा ते कोल्हापूर महापालिका निवडणुकीतून सवड काढत नाहीत, अशी जोरदार टीका केली. तसेच आमदार हाळवणकर यांना यंत्रमागधारकांनी निवडून आणले आहे, याची जाणीव ठेवावी, असाही इशारा देण्यात आला.