शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

Radhanagari Dam: राधानगरी धरणावर आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उभारू - मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:25 IST

राधानगरी धरण स्थळाच्या पायथ्याशी लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्यात येणार असून या ग्रंथालयाचा बरोबरीनेच संशोधन केंद्रही सुरू करण्यात येईल

राधानगरी/कसबा तारळे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा त्यांचे कार्यकर्तृत्व खऱ्या अर्थाने नव्या पिढीला समजण्यासाठी फक्त घोषणा किंवा वल्गना करून चालणार नाही त्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखला पाहिजे म्हणूनच राधानगरीधरण स्थळाच्या पायथ्याशी लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्यात येणार असून या ग्रंथालयाचा बरोबरीनेच संशोधन केंद्रही सुरू करण्यात येईल. याद्वारे राजर्षी शाहूंनी बांधलेले धरण, विद्यार्थी वसतिगृह, दाजीपूर अभयारण्य आणि त्यांचे कार्य त्याचा अभ्यास करून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.राधानगरी धरण स्थळावर उभारलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्र उद्घाटन समारंभ व कृतज्ञता सोहळा प्रसंगी ते बोलत होते. शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार मालोजीराजे प्रमुख उपस्थित होते. मंत्री उदय सामंत म्हणाले, शासनाच्यावतीने सध्या न्यू एज्युकेशन पॉलिसी सुरू आहे याद्वारे विद्यार्थी वसतिगृह, सर्वाना मोफत शिक्षण, फीमध्ये सवलत, प्राथमिक शिक्षणासाह शासनाच्या विविध योजना सुरू आहेत. मात्र या सर्वच योजना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी शंभर वर्षांपूर्वी सुरू केल्या असल्याचे सांगून त्यांनी भविष्यात बांधलेली धरणे शंभर वर्ष टिकवायची असतील तर शासनाने राधानगरी धरणाचा अभ्यास करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, देशाला समतेचा संदेश देण्याचे कार्य करणाऱ्या राजर्षी . शाहूंच्या या भूमीला इतिहास आहे आणि इतिहास असणारी भूमी भूगोल घडविते आणि इतिहासावरच भविष्यकाळातील भवितव्य घडत असते. भविष्यात राधानगरी पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध होईल पर्यटनवृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्धं करणार असून पर्यटनाचे एक रोल मॉडेल तयार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, शासनाने अभयारण्य विकास आराखड्यासाठी ११० कोटी रुपये निधी मंजूर केला असून यातील २५ कोटींच्या माध्यमातून विकासकामे सुरू असून उर्वरित कामासह · पर्यटनासाठी अडथळा ठरणाऱ्या सर्वच बाबींचा पाठपुरावा येणाऱ्या भविष्यकाळात राधानगरी पर्यटनदृष्ट्या व पर्यटनावर आधारित रोजगाराच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी प्रयत्न राहील.यावेळी खासदार धैर्यशील माने व खासदार संजय मंडलिक यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या उद्घाटन समारंभ व कृतज्ञता सोहळ्याच्या प्रारंभी नदीकाठावरील पन्नासहून अधिक गावांतून छत्रपती शाहू महाराज स्मृती ज्योत कार्यक्रमस्थळी आणण्यात आली कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, तहसीलदार मीना निंबाळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आदी उपस्थित होते.मागेल तेवढा निधी देणार

या कार्यक्रमासाठी पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहू शकले नाहीत, हाच धागा पकडून आपल्या भाषणात मंत्री उदय सामंत यांनी राधानगरी पर्यटन विकासासाठी मागील तेवढा निधी पर्यटन व पर्यावरणमंत्री ठाकरे देणार असल्याचा निरोप आपल्याकडे दिला असल्याचे सांगितले. प्रारंभी गोकुळचे संचालक व राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष अभिजित तायशेटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीradhanagari-acराधानगरीDamधरणUday Samantउदय सामंत