शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
3
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
4
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
5
दोन राज्यांतून भाजपसाठी वाईट बातमी; गेल्या वेळी शून्य, आता फक्त ५ जागांवर आघाडी
6
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
7
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
8
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
9
तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला...
10
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
11
Video - बापरे! चावीच हरवली... कर्नाटकात हातोड्याने तोडावं लागलं EVM स्ट्रॉन्ग रूमचं कुलूप
12
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
13
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: भीती, नैराश्य, संकटांपासून मुक्तीसाठी पठण करा 'गणेश रक्षा मंत्र'
14
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
15
ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणारे भाजपचे '५' नायक; या नेत्यांनी शांतपणे बंगालची समीकरण बदलली
16
IPL 2026: 'टेबल टॉपर' पंजाब किंग्जचा सलग दुसरा पराभव, श्रेयस अय्यर 'या' गोष्टीवर संतापला...
17
मोफत ८ ग्रॅम सोने अन् दरमहा २५०० रूपये...; कोणती ५ आश्वासने ज्यानं अभिनेता विजयची जादू चालली?
18
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
19
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
20
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
Daily Top 2Weekly Top 5

सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्र्यांना मिळेना वेळ!

By admin | Updated: July 5, 2016 00:26 IST

सोमवारचीही बैठक पुढे ढकलली : वकील वर्गामधून नाराजीचा सूर

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, यासाठी नागरिकांसह वकील बांधव प्रयत्नशील आहेत; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही कारणास्तव बैठकीसाठी वेळ न मिळाल्यामुळे सोमवारची मुंबईत होणारी बैठक पुढे ढकलली आहे. ही बैठक रद्द झाल्याचे समजताच कोल्हापुरातील वकील वर्गामधून नाराजीचा सूर उमटत होता.कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर खंडपीठ व्हावे, अशी मागणी दोन दशकांहून सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षांत सर्किट बेंचचा लढा वकीलांनी जोमाने पुढे नेला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दि. २९ जून २०१६ ला मुंबईला बैठकीसाठी बोलाविले; पण काही कारणास्तव ही बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ही बैठक सोमवारी (दि. ४) होण्याचा निरोप मंत्रालयातील विधि व न्याय विभागातून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. यामुळे वकीलांनी मुंबईला जाण्याच्या नियोजनाची तयारी सुरू केली. मात्र, शनिवारी (दि. २) सायंकाळी विधि व न्याय खात्याकडून मुख्यमंत्री फडणवीस हे सोमवारी नसल्याचा निरोप वकील पदाधिकाऱ्यांना देण्यात आला. हा निरोप समजताच वकिलांमधून संतापाची लाट उसळली. (प्रतिनिधी)पुन्हा आंदोलन करण्याची गरज...तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात या सहा जिल्ह्यांतील वकिलांनी सर्किट बेंचप्रश्नी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. त्याची दखलही या आघाडी सरकारला घ्यायला लागली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर खंडपीठासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, त्या देऊ, असा ठराव अधिवेशनात केला होता; पण, दीड वर्षे सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने सर्किट बेंचचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन देण्याव्यतिरिक्त काहीही केले नसल्याचा सूर वकील बांधवांमधून उमटत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाचे हत्यार उपसावे, अशी मागणी होऊ लागली आहे.सर्किट बेंचप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर बैठक व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे; पण त्यांच्यासमवेत असलेली बैठक दोनवेळा पुढे ढकलण्यात आली. त्यांच्याकडे आम्ही पुढील बैठकीची वेळ मागितली आहे. मात्र, त्यांनी वेळ दिलेली नाही. यावर १५ आॅगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करू.- अ‍ॅड. प्रकाश मोरे, अध्यक्ष, खंडपीठ कृती समिती तथा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन.