शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्पलाईनसाठी महिलांना दोनवेळा फोन करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:28 IST

महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी १०९१ या हेल्पलाईनला दोनवेळा फोन केल्यानंतरच तक्रारींची दखल घेतली जाते, असे चित्र आहे. या हेल्पलाईनला फोन घ्यायला पुरूष कर्मचारी असल्याने माहिती देण्यास महिला पुढे येत नसल्याचेही वास्तव आहे. दिवसभरात म्हणजे १२ तासांत सरासरी किमान २५ फोन या हेल्पलाईनवरयेत आहेत.

ठळक मुद्देहेल्पलाईनसाठी महिलांना दोनवेळा फोन करण्याची वेळपोलीस प्रशासनाचा कारभार : दिवसभरात २५ महिलांचे येतात फोन

कोल्हापूर : महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी १०९१ या हेल्पलाईनला दोनवेळा फोन केल्यानंतरच तक्रारींची दखल घेतली जाते, असे चित्र आहे. या हेल्पलाईनला फोन घ्यायला पुरूष कर्मचारी असल्याने माहिती देण्यास महिला पुढे येत नसल्याचेही वास्तव आहे. दिवसभरात म्हणजे १२ तासांत सरासरी किमान २५ फोन या हेल्पलाईनवरयेत आहेत.हैद्राबाद येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी प्रवासी वाहनांच्या आत ठळकपणे १५ डिसेंबरपूर्वी प्रदर्शित करावी. ही कार्यवाही पूर्ण केली का नाही, याची तपासणी पोलीस आणि परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी करावी, असे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने या हेल्पलाईनचा सध्या कितपत महिलांना उपयोग होतो, याची चौकशी केल्यावर दुसरीच माहिती पुढे आली.

या हेल्पलाईनचे नियंत्रण पोलीस नियंत्रण कक्षातून करण्यात येते. हा फोन घेण्यासाठी महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु गेल्या सहा महिन्यांपासून हे काम नियंत्रण कक्षातील पुरूष कॉन्स्टेबलकडे देण्यात आले आहे. त्यांच्याकडे महिलांचे फोन येतात; परंतु अनेकदा महिला काही बोलत नाहीत किंवा ताई नाहीत का अशी विचारणा करतात, अशी माहिती १०९१ वर संपर्क साधल्यावर मिळाली.

या कॉन्स्टेबलला महिलांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता येत नाहीत; त्यामुळे ते हेल्पलाईनवर फोन करणाऱ्या महिलांना २६५३१३१ हा जिल्हा महिला दक्षता समितीचा फोन नंबर देतात. संबंधित महिलेस पुन्हा तिथे फोन करावा लागतो व आपल्यावरील अन्यायाची दाद मागता येते. हा फोन सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असतो. महिलांवर अत्याचाराची एखादी घटना घडली, की प्रशासन तातडीने काही निर्णय घेते; परंतु त्यात कितपत संवेदनशीलता जपून मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न असतो, हेच यावरून दिसून येते.जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असे..महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या १५ नोव्हेंबर २०१४ च्या बैठकीतील सादरीकरणातील सूचनान्वये १०९१ हा हेल्पलाईन क्रमांक लिहिण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार हा हेल्पलाईन क्रमांक आॅटोरिक्षा, टॅक्सी, स्कूलबस, एसटी बस, खासगी प्रवासी बसेस, मोटार कॅब आणि खासगी प्रवासी वाहतूक वाहनांमध्ये प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी लिहिणे बंधनकारक राहील. याबाबत पोलीस व परिवहन विभागातील अधिकारी तपासणी करून खात्री करतील. 

 

टॅग्स :Womenमहिलाkolhapurकोल्हापूर