बेळगाव-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी जवळ बर्निंग बसचा थरार, बस जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:02 IST2023-01-05T17:50:40+5:302023-01-05T18:02:05+5:30
सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप

बेळगाव-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी जवळ बर्निंग बसचा थरार, बस जळून खाक
प्रकाश बेळगोजी
बेळगाव : बेळगाव-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या बसला भीषण आग लागली. बसमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी गावच्या हद्दीत आज, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
शॉर्ट सर्किट होऊन महामार्गावर राज्य परिवहन विभागाच्या बसला आग लागली. प्रसंगावधान राखून चालक आणि वाहकाने सर्व प्रवाशांना बस मधून बाहेर पडण्यास सांगितल्यामुळे सुदैवाने कोणालाही इजा झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यमकनमराडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.