शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

कोहळा मिळवण्यासाठीेच्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 16:35 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ्यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी झाले. तसेच धक्काबुक्की रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.

कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवीच्या भेटीच्या सोहळ्यावेळी कोहळा फोडण्याच्या विधीनंतर तो मिळवण्यासाठी झालेल्या धक्काबुक्कीत तीन तरुण जखमी झाले. तसेच धक्काबुक्की रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. कोहळ्याचे तुकडे घरी नेल्याने संपत्ती वाढते असा समज असल्याने तो मिळवण्यासाठी ही धडपड असते मात्र ही समजून अत्यंत चुकीची असून तिला धार्मिक आधार नसल्याचे तज्ञांनी सांगितले. अंबाबाई, तुळजाभवानी व गुरूमहाराजांची अशा तीन पालख्या   गुरूवारी सकाळी दहा वाजता त्र्यंबोली टेकडीला निघाल्या.

दरम्यान खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे व शहाजीराजे यांचेही मंदिर परिसरात आगमन झाले. त्यांच्या हस्ते गुरव कुटूंबातील सलोनी विनायक गुरव या कुमारिकेचे पूजन झाले. तिच्या हस्ते कोहळ््याला त्रिशुळ लावताच कोहळा मिळवण्यासाठी हुल्लजबाजीला सुरूवात झाली. दरवर्षी ठरावीक तरुणांकडून हे प्रकार केले जाते. यंदा त्यात तृतीयपंथियांनीही सहभाग घेतला होता. मंदिराभोवतीने सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. कोहळा मिळालेल्या तरुणामागे सगळे धावत सुटल्याने सोहळा पाहण्यासाठी आलेल्या महिला, बालके यांच्यासह भाविकांचीही पळापळ होत होती, भीतीदायक वातावरण होते.

पोलिसांनी लाठीमार करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही हे शक्य झाले नाही.  काहीही करुन कोहळा मिळवायचाच या तयारीने हे तरुण आले होते. या सगळ््या झाटपटीत दोन तरुण जखमी झाले. त्यानंतर बाहेर मात्र पोलिसांनी बघ्याचीच भूमिका घेण स्विकारले. त्यातच कोहळयाचा एक भाग अंबाबाईच्या पालखीत पडला. कोहळा पालखीत पडल्यानंतर त्यातला अर्धा भाग तरुणांना दिल्यानंतर वातावरण निवळले. दिडच्या दरम्यान तीनही पालख्या परतीच्या मार्गाला निघाल्या. 

सोहळ्याची पार्श्वभूमी-

शारदीय नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला कोल्हापुरची अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. अंबाबाईने कोल्हासुराचा अंत केल्यानंतर साजरा करण्यात आलेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीचा बोलवायचे राहिल्याने ती रुसून अंबाबाईकडे पाठ फिरवून बसली. हे लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीला गेली. यावेळी त्र्यंबोली देवीने अंबाबाईला तू कोल्हासुराचा वध कसा केलास ते दाखव अशी विनंती केली. ही मान्य करत अंबाबाईने राक्षसाचे प्रतिक म्हणून कोहळ््याचा वध करून दाखवला. त्यामुळे या दिवशी गुरव घराण्यातील मुलीच्या हस्ते त्रिशुळाने कोहळा फोडला जातो. कोहळा फुटुच दिला नाही-

सोहळा सुरू होण्यापूर्वी मंदिराशी संबंधित यंत्रणेने या सोहळ््याभोवती बॅरीकेटींग करण्याची सुचना पोलिसांना केली होती. मात्र ते पोलिसांनी केले नाही.  ज्यासाठी ही यात्रा होते तो कोहळाच यंदा फुटू दिला गेला नाही. गुरव कुटूंबातील मुलीने कोहळ््याला त्रिशुळ लावताच तो अख्खा पळवण्यात आला. कोहळा राक्षसाचे प्रतिक असल्याचे लोंकांना ते समजावे व तो मिळवण्यासाठी हुल्लडबाजी होवू नये म्हणून त्यावर राक्षसाचे चित्रही काढण्यात आले होते. तरी हा प्रकार थांबला नाही. कोहळा फोडण्याचा घरी नेण्याच्या या प्रकाराला कोणतेही धार्मिक संकेत नाहीत. राक्षस म्हणून कोहळ्याचा वध केला जातो. तो घरी नेणे म्हणजे राक्षसाच्या अवयवयाचे तुकडेच घरी नेण्याचा प्रकार आहे. त्यामुळे तो मिळवण्यासाठी केली जाणारी हुल्लडबाजी बंद व्हावी.अ‍ॅड. प्रसन्न मालेकर (मंदिर अभ्यासक)

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस